आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-जालना रोडवर भरधाव कारची तीन महिलांना धडक, दोघींचा जागीच मृत्यू; एक जण गंभीर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भरधाव वेगात असलेल्या कारने तीन महिलांना जोरदार धडक दिली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास औरंगाबाद-जालना रोडवरील धूत हॉस्पिटलसमोर हा अपघात झाला. एकाच कुटुंबातील दोन महिलांवर काळाचा घाला झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या भीषण अपघातात तुळसाबाई दामोदर गायकवाड (वय 70), आशामती विष्णू गायकवाड (वय 42) यांचा मृत्यू झाला आहे. तर आहिल्याबाई दादाराव गायकवाड (वय 50) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या तीनही महिला जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील देवठाणा येथील रहिवासी होत्या. लग्न समारंभासाठी या महिला याठिकाणी आल्या होत्या. धुत हॉस्पीटल चौकात त्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. दरम्यान चिकलठाण्याहुन सिडको बसस्थानक चौकाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सूटले आणि या महिलांना चिरडले. या भीषण अपघातात तुळसाबाई गायकवाड आणि आशामती गायकवाड या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या अहिल्याबाई यांना सामान्य घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान अपघात घडल्यानंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.