आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- शहरातील सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने रद्द केली आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने औरंगाबाद महानगरपालिकेला यासंदर्भात नोटीसही बजावली होती.
सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात प्राण्यांची होणारी गैरसोय, त्यांच्यासाठी असलेल्या पिंजर्यांची दुरवस्था, प्राण्यांना नैसर्गिक वातावरण मिळत नसल्याची कारणे या नोटिशीत नमूद करण्यात आली होती. मात्र, औरंगाबाद महानगरपालिकेने या नोटिशीवर कोणतेही ठोस पाऊल न उचलल्यामुळे अखेर केंद्रीय प्राणी प्राधिकरणाने सिद्धार्थ उद्यानात असलेले प्राणी संग्रहालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राणी संग्रहालयाची परवानगी रद्द झाल्यामुळे औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षणच नाहीसे होणार आहे. आवडते प्राणी पाहायला सुटीच्या दिवशी जाण्याची हक्काची जागा आता चिमुकल्यांसाठी नसणार आहे. त्यांचे मनोरंजन करायला त्यांचा कोणताच प्राणीमित्र आता सिद्धार्थ उद्यानात दिसणार नाही. पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादसाठी ही खूप नुकसानकारक बाब असेल, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.