आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसथांब्यावर नामोल्लेख अनिवार्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद महानगरपालिकेचे शहर बसथांबे आजही ‘बारसे’ होण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते. आज हे सर्व बसथांबे जाहिरातींनी पूर्णपणे भरून गेलेली दिसतात परंतु बसथांबा कुठला आहे याचा साधा कुठेही नामोल्लेख आढळत नाही. किमान औरंगाबादसारख्या शहरात बसस्थानकावर नामोल्लेख अनिवार्य असायला हवा, जेणेकरून प्रवाशांना प्रवास सुलभ होईल. कुठली बस येथे थांबते, कुठल्या नंबरची बस कुठल्या मार्गाने जाते, मार्गावरील थांबे कोणते याची परिपूर्ण माहिती बसथांब्यावर द्यावी. होय, कदाचित या सर्व माहितीसाठी लागणार्‍या जागेमुळे जाहिरातीवर आणि पर्यायाने पालिकेच्या उत्पनावर गदा येऊ शकेल, परंतु बसथांबे हे प्रामुख्याने जाहिरातीसाठी आहेत की प्रवाशांसाठी आहेत याचा विचार करून प्राधान्यक्रम ठरवावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनेक शहरांमध्ये शहर वाहतूक बसमध्ये आगामी बसथांबा कोणता याची आगाऊ सूचना देण्याची इलेक्ट्रॉनिक्स व्यवस्था असते, ‘या’ पर्यायाचाही विचार करायला हवा. बाहेरगावच्या प्रवाशांना या गोष्टी उपयुक्त ठरतात.
(पत्र ई-मेलद्वारे प्राप्त. )