Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | aurangabad chelipura truck accident

मद्यपी ट्रकचालकाची दहशतः फुलंब्रीहून औरंगाबाद शहरापर्यंत अनेकांना चिरडले; 1 जण ठार, 40 जखमी

प्रतिनिधी | Update - Mar 03, 2019, 04:22 PM IST

अखेर चेलीपुरा परिसरात जमावाने ट्रक अडवला आणि चालकाला बेदम मारहाण केली.

 • aurangabad chelipura truck accident

  औरंगाबाद - सिल्लोडहून सुसाट निघालेला एक ट्रक फुलंब्रीपासून वाहनचालक, पादचाऱ्यांना उडवत औरंगाबाद शहरात घुसला. हर्सूलपासून पुन्हा वाहनचालक, हातगाडीचालकांना उडवत शहरातील चेलीपुरा भागातील चौकात पोहोचेपर्यंत या ट्रकने पाचहून अधिक रिक्षा, आठपेक्षा अधिक दुचाकी आणि काही पाणीपुरी हातगाडीचालकांना उडवले. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मद्यपी ट्रकचालकाने हा धुमाकूळ घातला. चेलीपुरा भागात कसाबसा हा ट्रक जमावाने थांबवला, पण तोवर काही किलोमीटर अंतरात या ट्रकच्या अनियंत्रित वेगाने अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकवले, तर एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ३० ते ४० जण जखमी झाले आहेत.


  मिल कॉर्नर भागात राहणाऱ्या शेख मोहसीन शेख आमीन (२६) याचा यात मृत्यू झाला. प्रवीण मोरे असे ट्रकचालकाचे नाव असून त्याच्या सहकाऱ्याचे नाव अविनाश शिंदे (रा. आष्टी, बीड) असे आहे.

  शेख माेहसीन यांचा मृत्यू
  मृत शेख मोहसीन हे सामाजिक सेवा करणाऱ्या के. के. ग्रुपचे सक्रिय सदस्य होते. दिवसभर रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय करून रात्री घाटी रुग्णालयात ग्रुपच्या माध्यमातून रुग्णसेवेचे काम करत होते.

 • aurangabad chelipura truck accident
 • aurangabad chelipura truck accident
 • aurangabad chelipura truck accident

Trending