आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून करून मृतदेह ड्रम मध्ये लपवला, चोवीस तासांनंतर समोर आली धक्कादायक घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पत्नीचा गळा दाबून खून करून मृतदेह ड्रम मध्ये लपवून पती फरार झाला. चोवीस तसा नंतर वास यायला लागल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. रत्ना पंडित बिरारे (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. रत्ना व तिचा पती पंडित आरेफ कॉलनीत इसरार शेख यांच्या कडे कामाला होते. शेख यांनी त्यांच्या बंगल्यात च दांपत्याला राहण्यासाठी दोन खोल्या दिल्या होत्या. शुक्रवार सकाळ पासून दोघेही कामावर गेले नाही. शेख यांनी त्यांच्या खोलीकडे जाऊन पाहिले असता खोलीला कुलूप लावलेले होते. त्यांनी रत्ना यांच्या मोबाईल वर कॉल केला असता तोही बंद लागत होता. संध्याकाळी त्यांनी रत्ना यांच्या भावां शी संपर्क साधून दोघेही काहीही न सांगता कुलूप लावून चालले गेले आहे, असे सांगितले. त्यानंतर भावांना संशय आल्याने तत्काळ धाव घेऊन कुलूप उघडून घरात पाहिले, मात्र घरात रत्ना  व पंडित दोघेही नव्हते.
शनिवारी सकाळी त्यांच्या खोली च्या आजूबाजूला वास सुटला.  म्हणून शेख यांनी ड्रम मध्ये पाहिले असता बसलेल्या अवस्थेत रत्ना आढळून आला व त्यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ रत्ना यांचे माहेरी व बेगमपुरा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह घाटी रुग्णालयात नेला. दोन्ही दांपत्याला तीन मुली असून तीनही विवाहित आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित व रत्ना यांच्यात नेहमीच वाद होत होते. चारित्र्यच्या संशयावरून त्याने खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून पंडित चा शोध सुरू असल्याचे सांगितले.