आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची नंदूरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी नियुक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तात्याराव लहाने यांनी दिले नियुक्तीचे पत्र

औरंगाबाद- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची नंदूरबारमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, ते औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या उप अधिष्ठाता पदावरही कायम असणार आहेत. येत्या 16 डिसेंबरला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सुक्रे यांनी दिली.औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(घाटी रुग्णालय)चे उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची नंदूरबारमधील शासकीय वैदय्कीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सुक्रे यांनी 2011-12 मध्ये औरंगाबाद वैद्यकीय अधीक्षक तर सहयोगी उप अधिष्ठाता म्हणून मुंबईतील जे.जे. रुग्णालय येथे 2014 ते 2015 दरम्यान काम केले. त्यानंतर 2016 पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे उप अधिष्ठातापदी नियुक्त झाले.

'तात्याराव लहानेंचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर'
 
तात्याराव लहाने यांचा रुग्णासाठी अहोरात्र काम करण्याचा आदर्श माझ्यासमोर आहे.त्यामुळे नंदुरबार सारख्या आदिवासी भागात या निमित्ताने रुग्णसेवा करण्याची संधी मिळाली आहे. या भागातील रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे. नंदुरबार सारख्या आदिवासी भागात रुग्ण पाड्याच्या बाहेर पडत नाहीत। या महाविद्यालयाच्या निमित्ताने रुगणासाठी चांगली सेवा ता महाविद्यालयाच्या निमित्ताने मिळेल भविष्यात हे रुग्णालय सुपर स्पेसलिटी हॉस्पिटल होईल असा मला विश्वास असल्याचे शिवाजी सुक्रे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले

डॉ. सुक्रे यांचा परिचय
 
सुक्रे यांचं  9 पर्यत शिक्षण नेर जिल्हा जालना इथे झाले त्यानंतर औरंगाबाद तसेच MBBS शिक्षण औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथेच झाले. डॉ. शिवाजी बाळाभाऊ सुक्रे यांनी  1991 मध्ये एम.बी.बी.एस. केले. त्यानंतर 1998 मध्ये  एम.एस. पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सहाय्यक प्राध्यापक ते प्राध्यापक असा प्रवास औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केला. त्यानंतर ते प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून 2014 मध्ये ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जे जे रूग्णालय मुंबई येथे रुजू झाले. त्यानंतर 2010-11 दरम्यान औरंगाबाद येथे  वैद्यकीयऊप अधिक्षक म्हणून काम पाहीले. 2011-12 मध्ये ते  वैद्यकीय अधिक्षक झाले. पुढे 2014-15 मध्ये त्या जे जे रूग्णालयात सहयोगी ऊपअधिष्ठाता म्हणून काम केले. 2016 पासून ते आजपर्यंत ते औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात उप अधिष्ठाता म्ङणून काम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...