आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानपरिषदेत शिवसेनेची ताकद वाढणार..? औरंगाबाद-जालन्यातून 19 ऑगस्टला अप्रत्यक्ष मतदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी 19 ऑगस्टला निवडणूक होणार आहे, त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक आमदार वाढण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी जुलैपासून आचारसंहिता लागू झाली आहे. औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी ही आदर्श आचारसंहिता लागू असेल. आतापर्यंत या जागेवर काँग्रेसचे सुभाष झांबड आमदार होते, पण आता शिवसेनेचे पारडे जड दिसत असल्याने युतीचा आणखी एक आमदार विधानपरिषदेत वाढणार असल्याची शक्यता आहे.


या जागेसाठी 1 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना उमेदवारी भरता येईल, तसेच 5 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेता येणार आहेत. 19 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर 22 तारखेला या मतांची मोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 656 मतदार मतदान करणार आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात 17 मतदान केंद्र असणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात 9, तर जालना जिल्ह्यात 8 मतदान केंद्र असतील.


महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत सामीतीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य या निवडणुकीत मतदान करू शकतात. याआधी या मतदारसंघातून काँग्रेसचे सुभाष झांबड विजयी झाले होते. पण यावेळी शिवसेना-भाजपची सदस्य संख्या जास्त असल्यामुळे या जागेवर युतीचे पारडे जड आहे. युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्यामुळे शिवसेना या जागेसाठी कोणाला उमेदवारी देईल याबाबत उत्सुकता आहे. तर काँग्रेसकडून परत एकदा सुभाष झांबड निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे.


शिवसेनेची ताकद वाढेल
सध्या 78 सदस्यीय विधानपरिषदेत भाजपचे 23, शिवसेना 12 आणि रासपचा एक सदस्य आहे. तर युतीला पाठिंबा असणारे इतर 04 सदस्य असा हा आकडा 40 पर्यंत जातो. तर विरोधकांची संख्या 38 आहे. पण औरंगाबाद-जालना निवडणुकीनंतर युतीचा आणखी एक सदस्य वाढण्याची शक्यता आहे.