आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचखंड एक्सप्रेसमध्ये गेले सामान, प्रवासी मात्र राहिले खाली; औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील घटना

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
सचखंड एक्सप्रेसमध्ये या दाम्पत्याचे गेले सामान - Divya Marathi
सचखंड एक्सप्रेसमध्ये या दाम्पत्याचे गेले सामान

औरंगाबाद - औरंगाबाद येथील नातेवाईकांना भेटून गावी परतणाऱ्या प्रवाशांचे सामान रेल्वेत गेले मात्र प्रवासी खालीच राहिल्याची घटना शुक्रवारी येथील रेल्वे स्थानकावर घडली. आपले सामान रेल्वेत गेल्याचे महिलेला लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे व्यवस्थापकाशी संपर्क साधला. यानंतर मनमाड रेल्वे कक्षासह रेल्वे पोलिस ठाण्याला याबाबत माहिती दिली.  
सौ. कविता, सासू कौसल्याबाई, पति कृष्णा आणि दोन लहान मुले (सर्व रा.भीमनगर, भोपाळ) शहरातली हर्सुल येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. हे कुटुंब शुक्रवारी दुपारी 1 वाजेदरम्यान घरी परत जाण्यासाठी औरंगाबाद रेल्वे स्टेशनला पोहचले होते. गाडी नंबर 12715 नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस दुपारी 2 वाजून 8 मिनिटांनी औरंगाबाद येथे आली. जनरल डब्यात पाय ठेवण्यासाठी देखील जागा नव्हती. तरी कसेबसे डब्यात सामान चढवले. यानंतर सचखंड एक्सप्रेस 2:22 मिनिटांनी मनमाडकडे निघाली. चालू रेल्वेत चढता न आल्याने हे प्रवासी स्टेशनवरच राहिले. एक्सप्रेस निघुन गेल्यानंतर आपले सामान रेल्वेत गेल्याचे महिलेच्या लक्षात आले. यानंतर रेल्वे स्टेशन व्यवस्थापक एल के जाखडे यांच्याकडे गेले. दरम्यान रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी स्टेशनवर होते. त्यांनी रेल्वे पोलिस नियंत्रण कक्षासह मनमाड रेल्वे पोलिस ठाण्याला याबाबत माहिती दिली. यानंतर रेल्वे व्यवस्थापक आणि रेल्वे सेना अध्यक्षांनी सदर प्रवाशांना मनमाडला जाण्यासाठी 17618 नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस मध्ये बसवून दिले. तेथे मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यास सांगितले. दरम्यान संध्याकाळी या कुटुंबाला मनमाड येथे त्यांचे सामान परत मिळाले आहे.  

बातम्या आणखी आहेत...