आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : आठ ते दहा जणांच्या टोळक्याने वेटरला मारहाण करत तीन वेळा ‘जय श्रीराम’ म्हणायला लावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हॉटेलमध्ये दिवसभर काम केल्यानंतर गुरुवारी रात्री १२.३० वाजता घराकडे निघालेल्या तरुणाला हडको कॉर्नर परिसरात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने अडवून मारहाण केली व तीन वेळा ‘जय श्रीराम’चा नाराही द्यायला लावला. तरुणाने आरडाओरड केल्याने ओळखीचा एक जण धावून आला व त्याने आरोपींच्या तावडीतून सोडवून तरुणाला घरी पाठवले. बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


फिर्यादीत म्हटले आहे की, इम्रान इस्माईल पटेल (२८, रा. मुजफ्फरनगर, जटवाडा रोड) हा कटकट गेट परिसरातील मदिना तहारी हाऊस या हॉटेलवर वेटर आहे. रोज दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत तो या हॉटेलवर कामाला जातो. गुरुवारी नेहमीप्रमाणे तो काम संपवून रात्री १२ वाजता आपल्या घराकडे मोटारसायकलवरून जात होता. या वेळी हडको कॉर्नर परिसरात येताच आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्याला अडवले. ‘कुठे जात आहेस?’ अशी विचारणा करून शिव्या द्यायला सुरुवात केली. तेवढ्यात याच टोळक्यातील एकाने त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास सांगितले. नकार देताच त्यांनी मारहाण केली. इम्रानने आरडाओरड केली आणि गणेशभाऊ नावाची एक ओळखीची व्यक्ती पत्नीसह तिथे धावत आली. गणेशभाऊने त्या टोळक्याच्या तावडीतून इम्रानची सुटका केली.