आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्चपासून सर्व व्यापाऱ्यांना ११०० चा नवा वार्षिक कर, घरासाठी रोज एक, दुकानांसाठी दोन रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कचरा संकलन, वाहतुकीचा सात वर्षांचा ठेका बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीला देण्याचा प्रस्ताव सोमवारी (२२ ऑक्टोबर) स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाला. मार्च २०१९ मध्ये सुरू होणाऱ्या या कामासाठी कंपनीला सात वर्षांत २१४ कोटी १९ लाख ८४ हजार २५० रुपये दिले जाणार आहेत. त्याचा बोजा शहरावर पडणार आहे. मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांकडून मार्च महिन्यापासून दररोज एक तर व्यापारी प्रतिष्ठानांकडून दोन रुपये वसूल केले जाणार आहेत. व्यापाऱ्यांना घराचा एक अाणि दुकानाचे दाेन असे तीन रुपये म्हणजे वर्षभरात सुमारे ११०० रुपये द्यावे लागणार अाहेत. 


घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे आणि तो मनपा उभारणार असलेल्या प्रक्रिया केंद्रांवर पोहोचवणे या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. सोमवारच्या बैठकीत राखी देसरडा यांनी निविदा प्रक्रियेच्या चौकशीची मागणी केली. त्याकडे दुर्लक्ष करत सभापती राजू वैद्य यांनी एक हजार ८६३ रुपये प्रतिटन दराच्या या निविदेला मंजुरी दिली. 


८३० कर्मचाऱ्यांवर गंडांतर 
मनपा कचऱ्याच्या वाहनांवर, कायम व कंत्राटी कर्मचारी वेतनावर दरवर्षी २० कोटी रुपये खर्च करते. हीच रक्कम तसेच वरचे दहा कोटी रुपये नागरिकांना द्यावे लागणार आहेत. कारण दरवर्षी ठेकेदाराला ३० कोटी ५९ लाख ९७ हजार ७५० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या मनपा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त बचत गटांसह इतर ८३० कर्मचारी कामावर आहेत. खासगीकरणानंतर या कर्मचाऱ्यांची सेवा थांबवावी लागेल, असे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...