आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका आयुक्तांनी शुभेच्छा देण्यास आलेल्या नगर रचना विभाग प्रमुखांना ठोठावला 5000 रुपयांचा दंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरेंद्र केंदाळे

औरंगाबाद - औरंगाबाद महापालिकेचे पदभार स्वीकारताच अस्तीक कुमार पांडे यांच्या नावाची सोमवारी चर्चा सुरू झाली. त्यांच्या स्वागतासाठी सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यामध्ये नगर रचना विभाग प्रमुखांचा देखील समावेश होता. सहाय्यक संचालक नगर रचना श्री आर एस महाजन यांच्या एका चुकीमुळे दंड ठोठावण्यात आला. महापालिका आयुक्तांनी जागेवर ती चूक लक्षात घेऊन 5000 रुपयांच्या दंडाची पावती सोपविली.

याबाबत सविस्तर वृत्त असे, की नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक आर. एस. महाजन आयुक्तांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या दलनात पुष्पगुच्छ घेऊन गेले होते. परंतु, ते पुष्पगुच्छ बनविण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आला होता. अस्तीक कुमार पांडे यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी जागेवर महाजन यांच्याकडून 5,000 रुपये स्पॉट फाईन वसूल करण्याचे आदेश दिले. प्लास्टिकचा वापर केला या कारणावर आयुक्त दालन येथील वरिष्ठ लिपिक अनिल बोंडे यांनी महाजन यांच्याकडून 5000 रुपये दंड वसूल करून त्याची पावती दिली. गेल्या 44 दिवसांपासून आयुक्त नसल्याने शहरातील प्लास्टिक बंदी मोहीम बंद होती. आयुक्तांनी पदभार घेताच या कारवाईला पुन्हा प्रारंभ झाल्याचे दिसून आले आहे.