आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूजमधील ताेडफाेडीत मराठा अांदाेलक नाहीत; अाैरंगाबादच्या पोलिस आयुक्तांचे स्पष्टीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद' दरम्यान ९ अाॅगस्टला वाळूज एमआयडीसीत ७० कंपन्यांमध्ये झालेल्या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे, असे अाैरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत ५३ जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण गुन्हेगार अाहेत. अाराेपींपैकी काही जण वाळूजमधील कंपन्यांत कंत्राटी म्हणून काम करत असल्याचेही समाेर अाले अाहे. हल्लेखोरांची ओळख सीसीटीव्हीच्या मदतीने पटवून या सर्वांची कसून चौकशी सुरू असल्याचे अायुक्तांनी सांगितले. 


सोमवारी उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत पाेलिस अायुक्तांसह अाैरंगाबादेतील उद्याेजकांची मुंबईत बैठक झाली. मंगळवारी शहरात परतताच आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...