आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत घरफोडी, ७६ तोळे सोने, ५ लाखांची रोकड लंपास

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील सिडको एन-४ मधील बी सेक्टरमध्ये गावाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोराने तब्बल ७६ तोळे सोने, ४ लाख ७९ हजार रुपये रोख रक्कम व ५ हजार रुपये किमतीचे देवघरातील चांदीचे साहित्य चोरून नेले. सोमवारी सकाळी झाडांना पाणी टाकण्यासाठी काम करणारी महिला गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. सेवानिवृत्त शल्यचिकित्सक एन. जी. कलवले यांच्या घरी ही घटना घडली. कलवले हे पत्नी, मुलगा डॉ. समीर, सून व नातीसह २८ डिसेंबर रोजी सकाळी  कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मुंबईला गेले होते. सहा खोल्यांच्या बंगल्याला एकच प्रवेश मार्ग आहे. त्यांच्याकडे कामाला असलेल्या महिलांना बंगल्याच्या आवारात असलेली झाडे व रोपांना पाणी देण्यासाठी तसेच स्वच्छतेसाठी सांगून हे कुटुंब गावाला गेले. महिलांकडे कंपाउंडच्या गेटची चावी दिली होती. सोमवारी महिला नेहमीप्रमाणे सकाळी बंगल्यामध्ये गेली असता तिला मुख्य दरवाजासमोरील ग्रीलचा दरवाजा तुटलेला अवस्थेत दिसला. तिने तत्काळ हा प्रकार कुटुंबाला कळवला.