आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच-यावरुन महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ, एमआयएमच्या नगरसेवकाला पोलिसांनी उचलून सभागृहातून बाहेर नेले

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • डोअर-टू-डोअर कचरा संकलन करणार्‍या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने "कचर्‍यातच माती खाल्ल्या"चा उघडकीस

संतोष देशमुख

औरंगाबाद- कचऱ्यात दगड माती टाकून वजन वाढवून महापालिकेची फसवणूक करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी यांचा ठेका रद्द करावा व घनकचरा विभागाचे प्रमुख भोंबे यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी एम आयएम नगरसेवक आक्रमक झाले होते. महापौर योग्य निर्णय घेत नसल्याने व चोरांना पाठीशी घालत असल्याने त्यांनी महापोरांच्या डायस समोर ठिय्या आंदोलन केले. भोंडेला निलंबित करा, रेड्डी चा ठेका रद्द करा अशा घोषणा दिल्या. एवढेच नव्हे तर महापौर तुम्ही यात समावेश असल्याचे गंभीर आरोपी देखील केला. यावेळी एमआयएमच्या सात नगरसेवक निलंबित करण्यात आले तसेच, एमआयएमचे नगरसेवक अबु आली हशमी यांना मनपाच्या पोलिस अधिकारी व सुरक्षा कर्मचारी यांनी सभागृहातून खेचत बाहेर उचलून नेले.

शहरात डोअर-टू-डोअर कचरा संकलन करणार्‍या पी. गोपीनाथ रेड्डी यांच्या कंपनीने "कचर्‍यातच माती खाल्ल्या"चा प्रकार शनिवारी उघडकीस आल्याने महापालिकेचाही कचरा झाला आहे. कंपनीवर कायदेशीर कारवाईसाठी आयुक्‍त अस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. हा मुद्दा आज(बुधवार) महापालिका सभागृहात एमआयएम नगरसेवकांनी उपस्थित केला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने व मनपाची दगड माती टाकून लूट करणाऱ्या रेड्डी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने नगरसेवक आक्रमक झाले होते.

कंपनीला वजनावर प्रतिटन 1865 रूपये याप्रमाणे मोबदला दिला जात आहे. त्यामुळे कंपनी कचऱ्यासोबत दगड, माती, वीटांचे तुकडेही वाहून नेत असल्याच्या अनेक तक्रारी आजपर्यंत पालिकेकडे करण्यात आल्या. मात्र पालिकेने वेळोवेळी याकडे दुर्लक्ष केले. शनिवारी (दि.29) पडेगाव येथे नगरसेवक रावसाहेब आम्ले, सुभाष शेजवळ, आशा निकाळजे यांनी कचर्‍याच्या मापात पाप करणारा कंपनीचा हा प्रकार पालिका कचर्‍याने भरलेल्या ट्रक मुख्यालयात आणून समोर आणला. आयुक्‍तांनी स्वतः अधिकार्‍यांकरवी कचर्‍याचे तीन गाड्यांतील वजन केले तेव्हा एका गाडीत 1 टन कचरा आणि 7 टन माती असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्‍तांनी गंभीरतेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कंपनीवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 

चौकशीसाठी समिती गठीत केली असून यात घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, प्रभारी मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांचा समावेश आहे. सात दिवसांत ही समिती आपला चौकशी अहवाल देणार आहे. याबाबत माहिती देताना आयुक्‍त पांडेय यांनी सांगितले की, कंपनीचा हा प्रकार खूपच गंभीर आहे. त्यामुळे कंपनीवर कारवाई होणार हे निश्‍चित आहे.

बातम्या आणखी आहेत...