आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या संख्याबलातील एक पाकळी कमी  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमेश बोरनारे - Divya Marathi
रमेश बोरनारे

विद्या गावंडे

औरंगाबाद - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले रमेश बोरनारे यांनी जिल्हा परिषद.सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे हे पद रिक्त असून, प्रशासनाने हि माहिती शासनाला ढिसाळपणा केल्याने जि.प. मधील शिवसेनेचे संख्याबळ 18 वरुन 17 वर आले आहे. त्याचा फटका आगामी काळात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

सन 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद. निवडणुकीत शिवसेनेचे 18 सदस्य निवडून आलेले आहेत. यात रमेश बोरनारे हे शिवसेनेकडून वैजापूर तालुक्यातील घायगाव, गट नंबर 32 मधून निवडून आले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते वैजापूर मतदारसंघातून आमदार झाले आहेत. आमदार झाल्यानंतर त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा रितसर राजीनामा दिलेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. देवयानी डोणगावकर यांनी तत्काळ त्यांचा राजीनामा प्रशासनाकडे पाठवून तो शासनाला पाठवण्याचे निर्देश दिले होते. प्रशासनाने त्यांचा राजीनामा व आगामी काळात पाेटनिवडणुकीसंदर्भातील कार्यवाहीसाठी तत्काळ हालचाली करणे अपेक्षित होते. मात्र 11 नोव्हेंबरपर्यंत प्रशासनाने राजीनाम्याआधारे शासनाला पाठवण्यासाठी पत्र तयार करण्यात वेळ वाया घातला, त्यानंतर हे पत्र मंत्रालयातील अवर सचिवांना पाठवण्यासाठी 14 नोव्हेंबरचा मुहूर्त शोधत आणखी वेळ घेतला.

विशेष म्हणजे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदस्याने राजीनामा दिल्याची घटना ताबडतोब राज्य निवडणुक आयोगाला कळवणे बंधनकारक आहे.

प्रशासनावरील अध्यक्षांची पकड कमजोर 


शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. डोणगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पवनीत कौर यांच्या मतभेदाचा फटका जिल्ह्यातील विकासकामांना बसत आला आहे. कौर यांची नाराजी ओढावली जावू नये, यासाठी अधिकारीही अध्यक्षांचे निर्देश तत्काळ आमंलात तर आणत नाहीत, उलट सीईओंना खुष करण्यासाठी अध्यक्षांच्या शिपायापासून ते स्वीय सहाय्यकापर्यंत सर्वांनाच त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही., या घटना जिल्ह परिषदेतील अधिकाऱ्यांपासून ते विरोधी सदस्य व पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये चर्चेचा विषय बनलेल्या आहेत. प्रशासनाचा लगाम आपल्या हातात ठेवण्यात अध्यक्षा कमी पडल्याचा परिणाम आतापर्यंत कामकाजावर होत होता, आता तो शिवसेनेवरही होण्याची चिन्हे आहेत.पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर


राज्य निवडणुक आयोगाने 18 नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 22 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करणे सुरू होत आहे. 4 डिसेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. 12 डिसेंबरला मतदान तर 13 रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होईल. या कार्यक्रमानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमधील पिंपळवाडी (पिं.) गणाची पोटनिवडणुक होत आहे. प्रशासनाने ताबडतोब कार्यवाही न केल्याने बोरनारे यांच्या रिक्तपदासाठी घायगाव गटाचीही पोटनिवडणुक झाली असती, व जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्याचा फायदा शिवसेनेला झाला असता.

बातम्या आणखी आहेत...