आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- देशामध्ये विड्याच्या पानाचे एक वेगळेच महत्त्व आहे. पूजापाठपासून ते एखाद्या खास कार्यक्रमामध्ये विड्याच्या पानाचा उपयोग केला जातो. काही गावांमध्ये आजही लग्नातील वऱ्हाडींना पान देऊन स्वागत केले जाते. पान आपल्या देशातील सर्वात प्राचीन आणि जास्त पसंत केली जाणारी एक गोष्ट आहे. आयुर्वेदानुसार पान यौनशक्ती वाढवण्यासही मदत करते. परंतु काही लोक माऊथ फ्रेशनर म्हणून पानाचा वापर करतात.
आज आम्ही तुम्हाला अशा एका पानाविषयी सांगत आहोत, जे तुम्ही केलेल्या विचारापेक्षा जास्त महाग आहे. परंतु तरीही हे पान घेण्यासाठी ग्राहक रांगा लागतात.
स्पेशल पानात 70 लाख रुपये किलो किमतीची कस्तुरी आणि 2 लाख रुपये किलो किमतीचे काश्मीरी केशर
आम्ही तुम्हाला सांगत आहोत औरंगाबादच्या प्रसिद्ध तारा पान सेंटरमध्ये मिळणार्याळ कोहीनूर पानाची माहिती. तारा पान सेंटरमध्ये पान खाण्यासाठी संपूर्ण जगभरातून लोक येथे येतात. 10 रुपयांपासून ते 5 हजारांपर्यंत पान उपलब्ध असते. या सेंटरचे मुख्य आकर्षण म्हणजे 'कोहिनूर पान'. 'व्हायग्रा' नावानेही हे पान प्रसिद्ध आहे.
या पानात 70 लाख रुपये किलो किमतीची कस्तुरी आणि 2 लाख रुपये किलो किमतीचे काश्मीरी केशर टाकले जाते. त्यासोबतच या पानात 80 हजार रुपये किलो किमतीचे गुलकंद आणि सुगंधासाठी पश्चिम बंगालचे लिक्विड टाकले जाते.
कामोत्तेजना वाढवण्यासाठी टाकतात 'सिक्रेट फॉर्म्युला'युक्त पदार्थ
या पानात मोहम्मद सरफुद्दीन सिद्दीकी 'सिक्रेट फॉर्म्युला'ने कामोत्तेजना वाढवण्यासाठी तयार केलेली पावडर टाकतात. हे पान पुरुष आणि महिला दोघांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते. महिलांसाठी बनवलेल्या पानाची किंमत 3 हजार तर पुरूषांसाठी बनवलेल्या पानाची किंमत 5 हजार आहे.
तारा पान सेंटरमध्ये जवळपास 51 प्रकारचे पान बनवले जातात. येथे दिवसभरात जवळपास 10 हजारपेक्षा जास्त पान विकले जातात. त्यामुळेच या पानांचा आस्वाद घेण्यासाठी जगभरातील लोक येथे येतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.