Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Aurangabad: teen killed his twin brother over fight of 40 rupees

फक्त 40 रुपयांसाठी 14 वर्षीय मुलाने केली जुळ्या भावाची निर्घृण हत्या, हातोड्याने ठेचला चेहरा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 28, 2019, 03:23 PM IST

मोठा भाऊ झोपला असता आरोपीने त्या चेहर्‍यावर हातोड्याने वार करून त्याची हत्या केली.

  • Aurangabad: teen killed his twin brother over fight of 40 rupees

    औरंगाबाद- फक्त 40 रुपयांसाठी 14 वर्षीय मुलाने त्याच्या जुळ्या भावाची हातोड्याने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. दोन्ही भावडांच्या जन्मात केवळ अर्ध्या तासाचे अंतर होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

    मिळालेली माहिती अशी की, ही घटना मंगळवारी (ता.26) दुपारी घडली. आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले की, सोमवारी त्याचे भावासोबत कडाक्याचे भांडण झाले होते. त्याने घेतलेले 40 रुपये देण्यास नकार देत होता. आई-वडिलांनी दोघांनाही समज दिली होती. परंतु, आरोपीचा राग अजून शांत झाला नव्हता. मंगळवारी आरोपीचा भाऊ शाळेतून घरी आला. जेवण केल्यानंतर तो झोपायला गेला. आरोपीही त्याच्या पाठोपाठ खोलीत गेला. मोठा भाऊ झोपल्यानंतर आरोपीने त्या चेहर्‍यावर हातोड्याने वार करून त्याची हत्या केली. भाऊ मित्रासमोर मला कायम अपमानित करत होता. त्यामुळे नाराज झाल्याने हे कृत्य केल्याचे आरोपीने सांगितले.

Trending