आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार संजय शिरसाठ यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला; मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आरटीओकडून 300 ऑटोरिक्षांची सुविधा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार संजय शिरसाठ यांनी सहकुटुंब मतदानााचा हक्क बजावला - Divya Marathi
आमदार संजय शिरसाठ यांनी सहकुटुंब मतदानााचा हक्क बजावला

औरंगाबाद - औरंगाबाद शहरात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. शहरातील तीन मतदारसंघांतून एकूण 60 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अनेक शाळांवर मतदानासाठी लोकांची गर्दी होत आहे. औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सपत्नीक मतदान केले. नगरसेविका संगीता सानप यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी 78 वर्षांच्या आजीबाईंनी देखील उत्साहाने मतदान केले. दरम्यान यशोधरा कॉलनील मनपा शाळेत पावसामुळे चिखल साचला आहे. मतदान केंद्रापर्यंत जाताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. मात्र तरीही याठिकाणी मतदान करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. 


> औरंगावादच्या मंजुरपूरा येथे मतदान थांबले, राष्ट्रवादी व एमआयएमचे समर्थक यांच्यात बाचाबाची
> औरंगाबाद पूर्व 11 वाजेपर्यंत 13 टक्के मतदान
 

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आरटीओकडून 300 ऑटोरिक्षांची सुविधा
औरंगाबाद मधील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आरटीओ विभागाकडून शहरातील तीनही मतदारसंघातील दिव्यांग, वृद्ध, गरोदर महिला, स्तनदा माता मतदारांना मतदानाकरीता ने -आण करण्यासाठी 300 ऑटोरिक्षांची सुविधा देण्यात आली आहे. संबंधित मतदार ऑटोरिक्षांची मोफत सेवा घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना 1950 या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा लागेल. जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक शाखा व आरटीओ प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा रिक्षाचा उपक्रम औरंगाबाद मधील मतदानाची टक्केवारी निश्चित वाढवेल.