आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरात डोक्यात दगड घालून तरुणाचा खून, छिन्नविच्छिन्न चेहऱ्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची तारांबळ

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक

संतोष उगले

वाळूज : औरंगाबाद-नगर महामार्गावरील पंढरपूर गावातील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंढरपूर शाखेच्या समोरील मोकळ्या जागेत अंदाजे २५ ते ३० वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घेरडे, महिला फौजदार प्रिती फड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली.

यावेळी त्यांना छिन्नविच्छिन्न अवस्थेतील तरुणाचा मृतदेह आढळून आला. डोक्यात दगड मारून खून केल्याने मयत अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. गावचे सरपंच अखतर शेख, सदस्य बाळासाहेब राऊत आदींना पोलिसांनी मृतदेह दाखवून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोक्यात दगड मारल्याने डोक्याची कवटी फुटून चेहरा विच्छिन्न झाल्याने त्यांना ओळख पटवता आली नाही. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी ९ वाजेच्या सुमारास श्वान व ठसेतज्ञ पथक दाखल झाले होते.