आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी टंचाईमुळे सर्व शाळा सकाळच्या सत्रात; शिक्षणाधिकाऱ्यांचे गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • उन्हाळ्यातील पाणी टंचाई पाहता, ही मागणी करण्यात आली आहे

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्हयातील शाळा भीषण पाणी टंचाईमुळे उद्या (दि. 5) मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, असे आदेश पत्राद्वारे माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व पंचायत समिती आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना बुधवारी दिले आहे.

काही दिवसांपूर्वी शिक्षक संघटनांनी उन्हाळा सुरू झाल्यावर ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होते. आता तर केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरातील भागांमध्येही पाणी टंचाई दिसते. अनेक शाळा या दोन सत्रात भरतात. शिवाय दहावी-बारावीच्या परीक्षा देखील सध्या सुरू आहे. पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता. औरंगाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करत एका सत्रात शाळा भरवत त्यांची वेळ सकाळी 8 ते दुपारी 12.30 करण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे.


तसेच शाळांची मधली सुटी ही तीस मिनिटांची असेल. दोन सत्र पद्धतीने पद्धतीने भरणाऱ्या शाळांच्या वेळेत बदल नाही, आरटीई अधिनियम २००९ नुसार नियोजित अध्यापनाच्या तासात कोणताही बदल होणार नाही. याची काळजी शाळांनी घ्यावी. तसेच सुचनेनुसार वेळापत्रक गट शिक्षणाधिकारी यांनी निश्चित करावे व त्याप्रमाणे शालेय कामकाज होईल. याची क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत खात्री करावी.


शिवाय शासन निर्णय दि. 29 एप्रिल 2019 नुसार शैक्षणिक वर्षामधील कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला किमान तास निश्चित करणे यासाठभ विहित केलेल्या निर्देश तत्वाचे उल्लंघन होणार नाही. याची सर्व शाळा मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...