आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्दुल सत्तार गद्दार, हिरवा साप! पवित्र मातोश्रीची पायरी चढू देणार नाही; चंद्रकांत खैरे यांचा हल्लाबोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावर काँग्रेस तर उपाध्यक्ष पदावर भाजपचा ताबा
  • अब्दुल सत्तार यांच्यामुळे औरंगाबाद जिल्हापरिषदेत भाजपला उपाध्यक्ष - खैरे

विद्या गावंडे 

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे तर उपाध्यक्षपद भाजपकडे गेले आहे. काँग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी मीना शेळके यांनी तर शिवनेसेच्या वतीने उपाध्यक्ष पदासाठी शुभांगी काजवे यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती. परंतु, काजवे यांना उपाध्यक्ष पद मिळवता आले नाही. त्यांच्याऐवजी भाजपचे उमेदवार लहानू गायकवाड यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्यामुळे उपाध्यक्षपद भाजपच्या ताब्यात गेल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. सत्तारांवर कारवाई करण्यासाठी पक्षप्रमुखांकडे मागणी करणार 


निवडणुकीनंतर बोलताना खैरे म्हणाले की, अब्दुल सत्तार हे हिरवा साप असून त्यांनी गद्दारी केली आहे. अब्दुल सत्तारमुळेच औरंगाबाद जिल्हापरिषदेत भाजपचा उपाध्यक्ष झाला आहे.अशा हिरव्या सापाला पवित्र मातोश्रीची पायरी चढू देऊ नका असे पक्षप्रमुखांना सांगणार असल्याचे खैरे म्हणाले. कार्यकर्त्यांचा विरोध असताना देवयाणी डोणगावकर यांना तिकीट दिले, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केले पण तरीही गद्दारी करून ते भाजपकडे गेले हे आम्ही सहन करू शकत नाही. अशा गद्दारांवर कारवाई करण्याची मागणी पक्षप्रमुखांकडे करणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...