आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला अखेर सोडावा लागला खुर्चीचा मोह! तारोंची खुर्ची टेबल साखळीतून मुक्त , कुणीही नेऊ नये म्हणून साखळ्यांनी बांधली होती खुर्ची

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विभागातील एका कर्मचाऱ्याचा खुर्चीचा मोह चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. खुर्ची चोरीला जाऊ नये. अथवा कुणी नेऊ नये. यासाठी या वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने आपल्या खुर्चीला साखळ-दंडाने टेबलाला बांधून ठेवले होते. नेत्यांपेक्षाही कर्मचाऱ्यांमध्ये कशी खुर्चीची चढाओढ आहे. असे मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या प्रकाराचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. यावर वरिष्ठांच्या दबावामुळे अखेर शुक्रवारी त्या कर्मचाऱ्याने आपल्या खुर्चीला लावलेले कुलूप आणि साखळीतून मुक्त केल्याचे दिसून आले.


जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या विभागात कधी काय होईल सांगता येता येत नाही. आजवर नेते मंडळी आपली खुर्ची वाचवण्यासाठी अथवा खुर्ची मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्तया लढवतांना आपण पाहतो. मात्र औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील  एस. तारों हे कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते ज्या खुर्चीवर बसतात आणि टेबलचा वापर करतात. त्याला त्यांनी चक्क साखळी लावून मोठे कुलूप लावले होते.

येणारे- जाणारे त्यांच्या या प्रकारामुळे हासत अहो तुम्ही कुलूप का लावतात. हे कोण चोरून नेणार त्याला सोन थोडीच लागल आहे. असे म्हणत असे यावर तारो यांनी खुर्ची कुणीही गायब करत. २०१० पासून शासनाने भौतिक सुविधांसाठी निधी देणे बंद केले आहे. मी जर कुठे बाजूला गेलो आणि माझी खुर्ची कोणी उचलून दुसऱ्या विभागात नेली तर मला दुसरी खुर्ची स्वत:च्या खर्चाने आणावी लागले. हे सर्वांना  इथे माहिती आहे. एवढेच नाही तर याची कल्पना शिक्षणाधिकाऱ्यांना देखील आहे. असेही सांगितले होते. तसेच यापूर्वीच्या कर्मचाऱ्याचा एक किस्साही त्यांनी सांगितला. मात्र हासू झालेल्या या प्रकारामुळे अखेर शुक्रवारी वरिष्ठांचा दबाव आणि चर्चेमुळे तारों यांनी टेबल आणि खुर्चीला लावलेले कुलूप आणि साखळी काढून घेतली.

बातम्या आणखी आहेत...