आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोडणी करत अविरतपणे जपला कुस्तीचा छंद; प्रचंड मेहनतीतून तांड्यावरील लक्ष्मीच्या पावलांनी यशस्वी गाठला सोनेरी यशाचा पल्ला

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लातूरच्या औसा तालुक्यातील खानापूर तांड्यावरची लक्ष्मी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये चॅम्पियन

एकनाथ पाठक 

औरंगाबाद- घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आई-वडील आणि भावांची धडपड.  ही परिस्थिती बदलण्यासाठी  प्रत्यक्षात लक्ष्मीलाच हातात शस्त्र घ्यावे लागले.  हातात कोयता घेऊन तिच्या कोवळ्या हातांनी ऊसतोडणी केली. या खडतर कामानंतरही तिने कुस्तीच्या रांगड्या खेळाचा छंद जपला. मोलमजुरीनंतर कुस्तीचे डावपेच आत्मसात केले आणि अल्पावधीत राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. याने आत्मविश्वास दुणावला. यातून तिने आॅल इंडियात विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना कांस्य जिंकले व पहिल्याच सत्राच्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये  चॅम्पियन होण्याचा पराक्रम गाजवला. पहिल्याच प्रयत्नात लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील खानापूर तांड्यावरच्या लक्ष्मीने औरंगाबादच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सुवर्णपदक मिळवून दिले.

एकरभर शेतात कष्ट; शिक्षणासाठी करावा लागला संघर्ष


घरात खाती तोंडे सात आणि शेत एक एकर. कोरडवाहू शेतातले सारे काही उत्पन्न वरच्याच पाण्यावर अवलंबून. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे त्याचीही शाश्वती नाही. यातूनच सीताराम पवार हे आपली पत्नी, मुलगा नवनाथसोबत िमळेल ते काम करून आपल्या कुटंुबीयांचा उदरनिर्वाह करतात. अशातच लक्ष्मीलाही याच परिस्थितीने संकटाचा सामना करण्याचे जणू बाळकडूच मिळाले.


त्यामुळे कुठल्याही परिस्थिती न खचता आलेल्या संकटाचा धाडसाने सामना करण्यातच तिचा हातखंड आहे. तिला सातत्यपूर्ण संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही. कारण घरची सधन अशी परिस्थिती नाही. त्यामुळेच शिक्षणासह तिला कुस्तीचा छंद जोपासण्यासाठीही मोठी मेहनत घ्यावी लागली. यासाठी तिला भाऊ नवनाथची मोलाची  साथ मिळाली. त्यामुळेच लक्ष्मीने कष्टातून कुस्तीचा हा महागडा आणि आव्हानात्मक असा छंद यशस्वीपणे जपला आहे.


मोलमजुरीचे काम करत तिने राज्यस्तरीय  स्पर्धेत सहभाग घेतला. या पहिल्याच सहभागात तिने भावाने शिकवलेल्या डावपेचातून सोनेरी यशाचा पल्ला  गाठला. त्यामुळे तिचा आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर तिने प्रचंड  मेहनतीतून  पदवीला प्रवेश मिळवला.

कुस्तीमधील अव्वल  कामगिरीमुळे तिने डिसेंबर २०१९ मध्ये अखिल भारती


तरविद्यापीठ स्पर्धेत औरंगाबादच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली. तिने भिवानी येथील स्पर्धेत कांस्य जिंकले. त्यानंतर आता खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

बातम्या आणखी आहेत...