आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादची रातरागिणी अर्जेंटिनातील अ‍ॅकाँकागुआवर आज फडकावणार तिरंगा, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मनीषाची अव्वल कामगिरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर औरंगाबादची धाडसी युवा रातरागिणी गिर्याराेहक मनीषा वाघमारे आता अ‍ॅकाँकागुआ शिखरावर आज रविवारी तिरंगा झेंडा फडकावणार आहे. दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनामधील हे सर्वात उंच शिखर मानले जाते. या शिखरावर तिरंगा फडकावण्याची माेहीम फत्ते करण्यासाठी आता शिवछत्रपती पुरस्कार विजेती मनीषा सज्ज झाली.

२१ दिवसांच्या खडतर मेहनतीच्या बळावर तिला बेसकॅम्पवरचा पल्ला यशस्वीपणे गाठता आला. ही माेहीम फत्ते करण्यासाठी भारतामधील आठ गिर्याराेहक सहभागी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव गिर्याराेहक मनीषा वाघमारेचा समावेश आहे.

माेठ्या जिद्दीतून गाठला खडतर प्रवासाचा पल्ला

दक्षिण अमेेरिकेतील अर्जेंटिना येथील अ‍ॅकाँकागुआ हे सर्वात उंच शिखर आहे. याच माउंटला सर करून पराक्रम गाजवण्यासाठी मनीषा वाघमारेला खडतर प्रवास करावा लागला. मात्र, माेठ्या आत्मविश्वासाच्या बळावर तिने हे यश संपादन करण्यासाठीची आपली जिद्द कमी हाेऊ दिली नाही. ती ५ जानेवारी राेजी अर्जेंटिनाच्या माेहिमेला औरंगाबाद येथून रवाना झाली हाेती.

मिशन गाे फाॅर सेव्हन समिटचे टार्गेट; पाचव्या शिखरावर ठेवणार पाय

औरंगाबादच्या धाडसी गिर्याराेहक मनीषा वाघमारेने गिर्याराेहणामध्ये जगाच्या कानाकाेपऱ्यातील सर्वात उंच शिख‌रावर अटकेपार झेंडा फडकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. यासाठी तिने आपल्या करिअरमध्ये मिशन गाे फाॅर सेव्हन समिटचे टार्गेट ठेवले आहे. याच माेहिमेमध्ये आतापर्यंत तिने माेठ्या खडतर प्रवासातून जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर चार माेहिमा फत्ते केल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियामधील एलब्रेथा, दक्षिण आफ्रिकेतील केलाे मांजारेओ, आशियातील माउंट एव्हरेस्टचा (दाेन वेळा) समावेश आहे. यासह आता तिने आपल्या माेहिमेतील पाचव्या शिखरावर आगेकूच केली.
 

बातम्या आणखी आहेत...