आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे नामफलक पुसून संभाजीनगर लिहा : आमदार टी. राजा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वाळूज : औरंगाबाद नाव असलेले नामफलक पुसून संभाजीनगर असे नाव लिहिण्याची माेहीम हिंदू बांधवांनी हाती घ्यावी, असे आवाहन आमदार टी.राजासिंह यांनी रविवारी हिंदू जनजागृती समितीतर्फे बजाजनगर येथे आयोजित जाहीर सभेत केले. 
बजाजनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सन २०२३ मध्ये हिंदू राष्ट्र पूर्ववत अखंड करण्यासाठी सर्व हिंदूंनी जात, पक्ष, पंथ विसरून एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. या वेळी मंचावर सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे व हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांची उपस्थिती होती. 


टी. राजा यांनी गौहत्या, लव्ह जिहाद, हिंदू राष्ट्र तसेच राम मंदिर या मुद्द्यावर भाष्य केले. आगामी काळात संपूर्ण देश हिंदूमय करण्याच्या हेतूने हिंदू जनजागृती समितीकडून देशभर सभेचे आयोजन करण्यात येत असल्याचे या वेळी जुवेकर यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले. येत्या ८ फेब्रुवारी रोजी बजाजनगरात पहिल्या बैठकीतून परिसरातील शाळेतील ख्रिस्ती धर्मांधता बंद करण्यासाठी संघटना काम करणार असल्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या वेळी प्रवेशद्वारात छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आदी राष्ट्रपुरुष व क्रांतिकारकांच्या वेशभूषेत चिमुकले उपस्थित होते. 


तिलक लावूनच प्रवेश 
येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कुमकुम तिलक लावून आतमध्ये प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिस्तबद्ध पद्धतीमध्ये आयोजकांनी नियोजन व महिला, पुरुषांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता. साध्या वेशभूषेतसुद्धा पोलिस अधिकारी उपस्थित होते. 
 

बातम्या आणखी आहेत...