आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किस्सा खुर्सी का : जिल्हा परिषदेतही खुर्ची जाण्याची भिती; चक्क कर्मचाऱ्यांनी टेबल अन् खुर्चीला ठोकले टाळे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना खुर्ची ही जीवा पेक्षा अधिक प्रिय असते. परंतु येथील शिक्षण विभागातील एका कर्मचाऱ्याचा खुर्चीचा मोह पाहून भले भले चकीत होतात. खुर्ची चोरीला जावू नये. अथवा कुणी नेवू नये. यासाठी या वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने चक्क आपल्या खुर्चीला साखळ दंडाने टेबलाला बांधून ठेवली आहे. चोरीच्या भितीने त्यास भले मोठे कुलूपही लावले आहे.

जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या विभागात कधी काय काय होईल सांगता येता येत नाही. आजवर नेते मंडळी आपली खुर्ची वाचवण्यासाठी अथवा खुर्ची मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्तया लढवतांना आपण पाहतो. मात्र औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील  एस. तारव हे कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते ज्या खुर्चीवर बसतात आणि टेबलचा वापर करतात. त्याला त्यांनी चक्क साखळी लावून मोठे कुलूप लावले आहे. येणारे- जाणारे त्यांनी केलेल्या या प्रकारामुळे हासत हासत अहो तुम्ही कुलूप का लावतात. हे कोण चोरून नेणार त्याला सोनं थोडीच लागल आहे असे विचारतात. त्यावर तारव यांचे उत्तर देखील गमतीशीर आहे. त्यांनी सांगितले की, २०१० पासून शासनाने भौतिक सुविधांसाठी निधी देणे बंद केले आहे. मी जर कुठे बाजूला गेलो आणि माझी खुर्ची कोणी उचलून दुसऱ्या विभागात नेली तर मला दुसरी खुर्ची स्वत:च्या खर्चाने आणावी लागते. हे सर्वांना इथे माहिती आहे. एवढेच नाही तर याची कल्पना शिक्षणाधिकाऱ्यांना देखील आहे. एवढेच नाही तर माझ्या आधी या विभागात बलदेव पुरी होते. त्यांनी उन्हाळ्यात कुलर आणले होते. ते नसताना एक दिवस ते कुलर दुसऱ्या विभागात नेले. ही बाब कळाल्यावर त्यांनी ते कुलर पुन्हा आपल्या जागेसमोर आणून त्याला साखळी बांधून कुलूप लावले. त्यांची आता बदली झाली असून, ते जातांना मी ही साखळी आणि कुलूप त्यांच्याकडून घेतली. या प्रकारामुळे आता खुर्ची केवळ नेत्यांसाठीच नाही तर कर्मचाऱ्यांसाठीही अतिशय महत्त्वाची ठरली आहे. मात्र या प्रकारामुळे जि.प. सदस्य मधुकर वालतुरे यांनी आपल्याच शैलीत सांगितले की, अधिकाऱ्यांना लाखो रुपये खर्च करुन त्यांचे दालन सुधरवता येतात. पण कर्मचाऱ्यांना एक खुर्ची देता येत नाही. किती खेदाची बाब आहे.

बातम्या आणखी आहेत...