आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग पाचव्यांदा आॅस्ट्रेलियावर मात; भारत नवव्यांदा उपांत्य फेरीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डरबन - यशस्वी जायस्वाल (६२), अथर्वच्या (नाबाद ५५) अर्धशतकी खेळीपाठाेपाठ कार्तिक त्यागीने (४/२४) धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. भारताने उपांत्यपूर्व सामन्यात आॅस्ट्रेलिया संघावर ७८ धावांनी मात केली. भारताने सलग पाचव्यांदा आॅस्ट्रेलियाचा पराभव केला. तसेच नवव्यांदा वर्ल्डकपची सेमीफायनल गाठली.  आता चार वेळचा विश्वविजेता भारतीय संघ फायनल गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. आॅस्ट्रेलिया संघ बाहेर पडला. दाेन युवांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाच्या युवांसमाेर २३४ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलिया संघाचा अवघ्या १५९ धावांवर धुव्वा उडाला. आॅस्ट्रेलिया संघाकडून सलामीवीर सॅम फानिंगने (७५) एकाकी झुंज देताना अर्धशतक साजरे केले. तसेच स्काॅटने ३५ धावांची खेळी केली. मात्र, त्यांना आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. भारताकडून कार्तिक त्यागीने चार व अक्षय सिंगने तीन विकेट घेतल्या.  

अथर्वचे पहिले अर्धशतक : भारताकडून युवा फलंदाज अथर्वने नाबाद ५५ धावांची खेळी केली. त्याने करिअरमध्ये पहिले वनडे अर्धशतक साजरे केले. त्याने ५४ चेंडूंत पाच चाैकार व एका षटकारासह ही खेळी केली. यासह त्याने अर्धशतक ठाेकले.

बातम्या आणखी आहेत...