World cup 2019 / ऑस्ट्रेलियाचा विजय; न्यूझीलंडला उपांत्य फेरीचा प्रवेश लांबवला, ट्रेंट बोल्टची हॅटट्रिक

न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीत प्रवेशासाठी इंग्लंडला हरवावे लागे

वृत्तसंस्था

Jun 30,2019 09:09:00 AM IST

लॉर्ड््स - विश्वचषकात शनिवारी दुसऱ्या सामन्यात मिचेल स्टार्कच्या ५ बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ८६ धावांनी विजय मिळवला. यापूर्वी न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीत प्रवेशासाठी इंग्लंडला हरवावे लागेल. हा सामना ३ जुलै रोजी होईल.


ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २४३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव ४३.४ षटकांत सर्वबाद १५७ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून विलियम्सनने सर्वाधिक ४० धावा केल्या. गुप्टिलने २० आणि टेलरने ३० धावा काढल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने २६ धावा देत ५ गडी बाद केले. ही त्याच्या करिअरची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. बेहरेनडोर्फने २ विकेट घेतल्या.


तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने १२९ चेंडूत ८८ धावांची खेळी केली. त्यानंतर तळातील फलंदाज कॅरीने ७२ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या. ट्रेंट बोल्टने ५१ धावांत ४ बळी घेतले.


ट्रेंट बोल्टची हॅटट्रिक
न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट चालू विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज बनला. विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा बोल्ट न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज बनला. यापूर्वी भारताच्या मो. शमीने २२ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध हॅटट्रिक घेतली. बोल्ट आणि शमीचा एक योगायोग आहे. या दोघांनी सामन्याच्या अखेरच्या षटकात तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर बळी घेतले. बोल्टने ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा, मिचेल स्टार्क व बेहरेनडोर्फला बाद केले.

X
COMMENT