आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी गर्भवती महिलेने घेतला पुढाकार, या आगीत आतापर्यंत 200 घरे खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - ऑस्ट्रेलियातीक जंगलात वणवा पेटला आहे. अशावेळी 23 वर्षीय कॅट रॉबिन्सन विल्यम्स तीन महिन्यांची गर्भवती असताना आग विझवण्याचे काम करत आहे. ती 11 वर्षांपासून न्यू साउथ वेल्स रुरल फायर सर्व्हिसमध्ये अग्निशमन जवान म्हणून कार्यरत आहे. 


विल्यम्स सांगते की, तिचे अनेक मित्र तिच्या या कामाबाबत चिंतित आहे. ते तिला अशा अवस्थेत आगीपासून दूर राहण्यास सांगत आहेत. विल्यम्सने सोशल मीडियावर लिहिले की, "जंगलात भीषण आग लागली आहे. लोक संकटात आहेत. त्यांचे घर जळून खाक होत आहेत. अशा परिस्थितीत मी शांत बसू शकत नाही."


कॅट विल्यम्स सांगते की, "गर्भवती असताना असे काम करणारी मी पहिली अग्निशमन कर्मचारी नाहीये आणि शेवटची पण राहणार नाही. मी दुसऱ्यांचा मदत करण्यास सक्षम आहे. यामुळे मी या परिस्थितीचा खंबीरपणे सामना करेन. मी एक अग्निशमन कर्मचारी आहे. मी एक मनुष्य नाहीये. मी गर्भवती आहे. लोकांना जर माझे काम आवडत नसेल तर मला त्याबाबत काहीही वाटत नाही." 

विल्यम्सच्या या कामाला लोकांचे समर्थन मिळत आहे. इतकेच नाही तर काही लोक त्यांना मुलींसाठी प्रेरणा असल्याचे सांगत आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 हून अधिक घरे जळून खाक झाली आहेत.  आजी आणि आईने देखील अग्निशमन जवानाचे काम केले आहे

रॉबिन्सन विल्यम्सने सांगितले की, "1995 मध्ये लागलेल्या आगीच्या वेळी माझी आईने अग्निशमन कर्मचारी म्हमून काम केले होते. त्यावेळी सुद्धा माझी गर्भवती होती. याशिवाय माझ्या आजीने 50 वर्षे अग्निशमन कर्मचारी म्हणून काम केले आहे. आता हे काम माझ्या परिवाराच्या परंपरेप्रमाणे झाले आहे."

विलियम्सने पुढे बोलतांना सांगितले की, आग विझवण्याबाबत त्यांना डॉक्टरने देखील परवानगी दिली आहे. पण योग्य उपकरणे परिधान करण्याची सुचना देखील दिली आहे.