आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Australia | Dog Owners Could Face Fines Animal Welfare Legislation Amendment Bill

पाळीव कुत्र्यांना दररोज बाहेर फिरवणे अनिवार्य, असे न केल्यास होणार 2 लाख रुपये दंडाची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनबेरा - ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामध्ये पाळीव कुत्र्यांना दिवसातून एक वेळ फिरवणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे न केल्यास संबंधिताला 1.90 लाख (2700 डॉलर) रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. 

सरकारने पशु कल्याण कायदा दुरुस्ती विधेयक गुरुवारी लागू केले. यामध्ये प्राण्यांच्या कल्याणासाठी कठोर नियम बनवण्यात आले आहेत. कुत्र्याच्या मालकांनी त्यांचे भोजन, निवारा आणि पाण्याची योग्य व्यवस्था न केल्यास स्पॉट दंडाची व्यवस्था या कायद्यात करण्यात आली आहे. जे कुत्र्यांना चोवीस तास आपल्याजवळ ठेवतात त्यांनी कुत्र्यांना किमान दोन तास मुक्त सोडावे लागणार आहे.