आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Australia Fire : Spin Legend Shane Warne Auction His Baggy Green Cap To Raise Funds For Australia Bushfire Victims

शेन वॉर्न आपल्या आवडत्या 'ग्रीन हॅट'चा करतोय लिलाव, मिळणाऱ्या पैशातून जंगलातील आगीतील पीडितांना करणार मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलियाच्या जंगलात अनेक महिन्यांपासून लागलेल्या आगीत 50 कोटी प्राणी ठार
  • इतर अनेक क्रिकेटपटूंनी स्वतःकडून पीडितांना मदत करण्याची केली घोषणा
  • टेनिस स्टार शारापोव्हा आणि जोकोविच 25-25 हजार डॉलर्सची करणार मदत

स्पोर्ट डेस्क - ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत परिधान केलेी हिरव्या रंगाच्या टोपीचा लिलाव करत आहे. शेन वॉर्नने म्हटले की, या लिलावातून मिळणाऱ्या पैशातून ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीतील पीडितांना मदत करणार आहे. त्याने सोमवारी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर ही घोषणा केली. लिलाव सुरू झाल्याच्या पहिल्या काही तासांत ही बोली 3 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे दीड कोटी रुपये) च्या पुढे गेली. 12 जानेवारीपर्यंत या टोपीसाठी बोली लावता येणार आहे. 
वॉर्नने आपल्या पोस्टमध्ये लिहीले की, "ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे आमचा आत्मविश्वास डगमगला आहे. या भयंकर आगीचा परिणाम इतक्या लोकांवर होत आहे, ज्याची कल्पना देखील करता येणार नाही. या आगीमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. घरे जळून खाक झाली आहेत आणि 50 कोटींहून अधिक जनावरे या आगीत भस्मसात झाले आहेत. अशा या कठीण प्रसंगी प्रत्येकजण एकमेकांसोबत आहे. तसेच आम्ही दररोज पीडितांना मदत आणि सहयोग करण्याचे मार्ग शोधत आहोत. या कारणामुळेच मी माझी आवडती 'बॅगी ग्रीन कॅप (350)चा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कॅप मी माझ्या पूर्ण (जेव्हा मी माझी पांढरी फ्लॉपी टोपी परिधान करत नव्हतो) कसोटी कारकिर्दीत परिधान करत होतो."

अनेक क्रिकटेपटूंनी केली मदतीची घोषणा 


वॉर्नने शेवटच्या ओळीत लिहीले की, 'माझी ही बॅगी ग्रीन कॅप ज्यांना मदतीची गरज आहे अशा सर्वांना मदत करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निधी गोळा करू शकेल अशी मला आशा आहे.' याअगोदर ख्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल आणि डार्सी शॉर्ट सारख्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी बिग बॅश लीगमध्ये त्यांच्या वतीने मारण्यात येणाऱ्या प्रत्येक षटकारावर 250 ऑस्ट्रेलियन डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे.शारापोव्हा आणि जोकोविच 25-25 हजार डॉलर्सची करणार मदत 


इतर खेळांमधील खेळाडू देखील मदतनिधी गोळा करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत. टेनिसस्टार मारिया शारापोव्हा आणि नोवाक जोकोविच यांनी सुद्धा ऑस्ट्रेलिया बुशफायर रिलीफ फंडसाठी स्वतःकडून 25-25 हजार डॉलर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...