A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: Illegal string offset 'level2_catname'

Filename: models/articles.php

Line Number: 34

Australia have not been able to score more than 200 runs in 116 years | पहिल्या कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात 3 बाद 151 धावा, 166 धावांची घेतली आघाडी; ऑस्ट्रेलिया संघाच्या 116 वर्षांपासून अॅडिलेडमध्ये 200 पेक्षा कमी धावा
Australia have not been able to score more than 200 runs in 116 years

पहिल्या कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात 3 बाद 151 धावा, 166 धावांची घेतली आघाडी; ऑस्ट्रेलिया संघाच्या 116 वर्षांपासून अॅडिलेडमध्ये 200 पेक्षा कमी धावा

वृत्तसंस्था | Update - Dec 09, 2018, 07:57 AM IST

पुजारा ४० धावांसह मैदानात, लाेकेश राहुलने बनवल्या ४४ धावा

 • Australia have not been able to score more than 200 runs in 116 years

  अॅडिलेड- ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावात ३ बाद १५१ धावा काढल्या. चेतेश्वर पुजारा ४० आणि अजिंक्य रहाणे एका धावांसह मैदानात टिकून आहे. लोकेश राहुल ४४, मुरली विजय १८ आणि कर्णधार विराट कोहली ३४ धावांवर परतले.

  भारताला पहिल्या डावात १५ धावांची आघाडी मिळाली होती. भारताने एकूण १६६ धावांची आघाडी घेतली आहे. भारतासाठी ही चांगली स्थिती आहे. कारण ऑस्ट्रेलिया टीम या मैदानावर गेल्या ११६ वर्षांत २०० पेक्षा अधिक लक्ष्य गाठू शकला नाही. त्यांनी अखेरच्या वेळी १९०२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ६ बाद ३१५ धावा करत सामना जिंकला होता.

  सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी सामना पावसामुळे ४५ मिनिटे उशिरा सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ७ बाद १९१ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. स्टार्क (१५) बुमराहने पंतच्या हाती झेल बाद केले. त्यानंतर पावसाने सुरुवात केली आणि ५५ मिनिटे सामना रोखण्यात आला. पुन्हा सामना सुरू झाल्यावर लायन (नाबाद २४) आणि हेड (७२) जोडीने नवव्या गड्यासाठी ३१ धावा जोडत संघाला २३५ धावांपर्यंत पोहोचवले. ९९ व्या षटकात सलग दोन चेंडूंवर मो. शमीने हेड अाणि हेजलवुडला (०) बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव ९८.४ षटकांत २३५ धावांवर संपुष्टात आणला.

  विजय-राहुलची अर्धशतकी भागीदारी
  प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. विजय आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. विजयला स्टार्कने सामन्यात दुसऱ्यांदा बाद केले. राहुल खराब फटका खेळत हेजलवूडच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर पुजाराने कर्णधार कोहलीसोबत ७१ धावांची भागीदारी करत धावसंख्या १४७ पर्यंत पोहोचवली. आता भारतीय संघ दुसऱ्या डावात संघाची धावसंख्या ३०० पेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न करेल.

  पंतची धोनीशी बरोबरी
  ऋषभ पंतने लढतीत सहा झेल घेतले. त्याने एका डावात सर्वाधिक झेल घेणाऱ्या धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. महेंद्रसिंग धोनीने २००९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनमध्ये एका डावात सहा झेल घेतले होते.

  विराट कोहलीने केल्या ऑस्ट्रेलियात सर्वात कमी डावांत हजार धावा
  > विराट कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये १८ डावांत आपल्या एक हजार धावा पूर्ण केल्या. भारतीय फलंदाजांत सर्वाधिक. व्हीव्हीएस लक्ष्मणने १९ डावांत आणि सचिन तेंडुलकरने २२ डावांत अशी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हजार धावा करणारा तो २८ वा विदेशी फलंदाज ठरला.
  > विराटने ऑस्ट्रेलियात ५९.०५ च्या सरासरीने हजार धावा केल्या. गेल्या ५० वर्षांत कोणत्याही फलंदाजाला अशी सरासरी गाठता आली नाही.

Trending