आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन वर्षांनंतर अाॅस्ट्रेलियाचा कसाेटी मालिका विजय, श्रीलंकेचा पराभव केला, 366 धावांनी जिंकली दुसरी कसाेटी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनबेरा - अाॅॅस्ट्रेलिया टीमने साेमवारी दुसऱ्या कसाेटीत श्रीलंकेचा पराभव केला. अाॅस्ट्रेलिया टीमने ३६६ धावांनी सामना जिंकला. यासह अाॅस्ट्रेलिया संघाने दाेन कसाेटी सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. तब्बल दाेन वर्षांनंतर अाॅस्ट्रेलिया टीमचा कसाेटीत मालिका विजय ठरला. तसेच तीन मालिकांनंतर या विजयाची नाेंद कांगारूंना करता अाली. यापूर्वी अाॅस्ट्रेलिया टीमने २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिका ४-० ने जिंकली हाेती. 


विजयाच्या खडतर ५१६ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंका टीमचा धुव्वा उडाला. त्यामुळे या टीमला १४९ धावांपर्यंत मजल मारता अाली. अाॅस्ट्रेलियाकडून वेगवान गाेलंदाज मिशेल स्टार्कने पाच विकेट घेतल्या. पॅट कमिन्सने तीन गडी बाद केले. अाता स्टार्कला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात अाले. या सामन्यातील त्याची कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्याने या कसाेटीत एकूण दहा विकेट घेतल्या. यात पहिल्या डावातील पाच बळींचा समावेश अाहे. त्यामुळे श्रीलंका टीमच्या फलंदाजांचा फार काळ मैदानावर निभाव लागला नाही. यातूनच श्रीलंकेने झटपट गाशा गुंडाळला. याचाच फायदा घेत अाॅस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या कसाेटीत विजयाची नाेंद केली. 
पहिल्या कसाेटी विजयाने अात्मविश्वास द्विगुणित झालेल्या अाॅस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या कसाेटीत शानदार खेळी केली. श्रीलंकेला पहिल्या डावात २१५ धावांवर राेखून अाॅस्ट्रेलियाच्या गाेलंदाजांनी कसाेटीत अापला दबदबा निर्माण केला. यात स्टार्क एकट्याने श्रीलंकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्याने पहिल्या डावात पाच गडी बाद केले. त्यामुळे अाॅस्ट्रेलियाला पहिल्या डावात माेठी अाघाडी मिळाली. त्यानंतर अाॅस्ट्रेलियाने अापला दुसरा डाव तीन बाद १९६ धावांवर घाेषित केला. यातून श्रीलंंकेला माेठे लक्ष्य मिळाले. या ५१६ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांची पुन्हा एकदा धूळधाण उडाली. यात कुशल मेंडिसने एकाकी झंुज देताना सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. यातील सात फलंदाजांना धावांचा दुहेरी अाकडाही पार करता अाला नाही. यामुळे श्रीलंका संघाला अापला दुसरा डावही झटपट गुंडाळावा लागला. 
 

बातम्या आणखी आहेत...