आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वणव्यात होरपळणाऱ्या ऑस्ट्रेलियात आता 10 हजार उंटांना ठार मारणार; म्हणे ते मिथेनचे उत्सर्जन करतात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनबेरा : जंगलात पसरलेल्या वणव्यामुळे ऑस्ट्रेलियात आता १० हजार उंटांना ठार मारण्याची योजना आहे. हे उंट वर्षभरात एक टन मिथेन वायूचे उत्सर्जन करतात, असे कारण देण्यात आले. हे प्रमाण एक टन कार्बन डाय ऑक्साइडइतके आहे. तर रस्त्यावर धावणाऱ्या चार लाख कारच्या प्रदूषणाइतके आहे. स्थानिक संघटना एपीवायचे यांच्या मते, उंटांना मारण्याचे आणखी एक कारण दक्षिण ऑस्ट्रेलियात पाण्याची जाणवणारी कमतरता हेही आहे. बुधवारपासून हेलिकॉप्टरद्वारे शूटर उंटाना मारत आहेत. मध्य ऑस्ट्रेलियात यांची संख्या १२ लाख इतकी आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, ते ग्लोबल वाॅर्मिंग वाढवत आहेत. एपीवाय कार्यकारी बोर्डाच्या सदस्या मारिया बेकर म्हणाल्या, उंट घरात शिरून एअरकंडिशनरमधील पाणी पितात. उंटाची लोकसंख्या दर ९ वर्षांत दुप्पट होते. येथे २००९ ते २०१३ दरम्यान १.६० लाख उंट मारण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...