international / ऑस्ट्रेलिया : मेटल डिटेक्टरने जमिनीच्या आता मिळाला 1.5 किलो वजनाचा सोन्याचा तुकडा, किंमत आहे 70 लाख रुपये 

सोन्याची खदानींसाठी प्रसिद्ध आहे कालगूर्ली... 

दिव्य मराठी वेब टीम 

May 25,2019 04:36:00 PM IST

सिडनी : पश्चिमी ऑस्ट्रेलियाच्या कालगूर्ली येथील सोन्याच्या खदानीमधून एका व्यक्तीने मेटल डिटेक्टरचा वापर करून जमिनीतून सोन्याचा 1.5 किलोग्राम वजनाचा तुकडा काढला. याची किंमत सुमारे 70 लाख रुपये सांगितली गेली आहे. हा तुकडा जमिनीच्या स्तराखाली 45 सेमी (अर्धा मीटर) खाली आहे.

सोन्याचा तुकडा ज्याला मिळाला त्या व्यक्तीचे नाव सांगण्यात आलेले नाही. त्याला पहिल्यांदा असे वाटले नव्हते कि हे सोनेच असेल. पण पिवळे आणि काहीसे चमकदार असल्यामुळे त्याला दुकानदार मॅट कुककडे घेऊन गेला. कुक म्हणाला - हा तुकडा पाहून माझा चेहरा खुलला. नंतर त्याने याचा फोटो ऑनलाइन प्रसिद्ध केला.

कुक सोन्याच्या खदानीत काम करणाऱ्या मजुरांना दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देतात. त्यांचे म्हणणे आहे की, हा तुकडा झाडांजवळील जमिनीजवळ मिळाला. याचा शोध घेणारा व्यक्ती स्वछंदी आहे आणि हौस म्हणून तो जमिनीच्या आतमधील गोष्टींचा शोध करत असतो. ऑस्ट्रेलियाच्या तीन चतुर्थाउंश सोन्याच्या खदानी कलगुर्ली क्षेत्रात आहेत. जाणकारांचे म्हणणे आहे की, येथे काम करणाऱ्या लोकांच्या हाती अशा वस्तू काही विशिष्ठ वेळीच लागतात.

X
COMMENT