Home | Gossip | Australian actor Chris Hemsworth has named his daughter 'India Rose' as he like India

भारताविषयी खूप आत्मीयता असल्यामुळे, ऑस्ट्रेलियन अभिनेता क्रिस हॅमस्वर्थने आपल्या मुलीचे नाव ठेवले 'इंडिया रोज'

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 11, 2019, 05:01 PM IST

भारतातील लोकांनी केले सपोर्ट : हॅमस्वर्थ... 

 • Australian actor Chris Hemsworth has named his daughter 'India Rose' as he like India

  हॉलिवूड डेस्क : ऑस्ट्रेलियन अभिनेता क्रिस हॅमस्वर्थने आपल्या मुलीचे नाव इंडियाच्या नावावर ठेवले आहे. हॅमस्वर्थने सांगितले की, तो आणि त्याची पत्नी एल्सा पॅटकीच्या मनामध्ये भारताला विशेष स्थान आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचे नाव 'इंडिया रोज' ठेवले आहे.

  हॅमस्वर्थने एजन्सीला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये सांगितले, 'मी आणि पत्नीने खूप काळ भारतात घालवला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मुलीचे नाव या देशाच्या नावावर ठेवले, इंडिया.'

  भारतात केले वेब सीरीजचे शूटिंग...
  मागच्यावर्षी हॅमस्वर्थ नेटफ्लिक्सची थ्रिलर वेब सीरीज 'ढाका'साठी भारतात आला होता. त्याने अहमदाबाद आणि मुंबईमध्ये या वेब शोचे शूटिंग केले होते. हे काम केल्याचा आपला अनुभव सांगत तो म्हणाला होता, 'मी सेटवर असायचो तेव्हा मला रॉचकस्टारसारखे ट्रीट केले जायचे. मला हा देश खूप आवडला. रस्त्यावर रोज हजारो लोक असायचे आणि मी कधीच सेटवर असा अनुभव घेतला नाहीये. हे खूपच रोमांचक होते. '

  भारतातील लोकांनी केले सपोर्ट : हॅमस्वर्थ...
  हॅमस्वर्थ पुढे म्हणाला, 'जसे डायरेक्टर कट म्हणायचे तिथे उभे असलेले लोक ओरडायचे. मला असे वाटायचे मी एखाद्या स्टेडियममध्ये बसलो आहे आणि एक रॉकस्टारसारखा परफॉर्म करतो आहे. त्यांच्या ओरडण्याने चिअर करण्याने मला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत होती.

  इंडिया रोज बरोबरच हॅमस्वर्थ आणि पत्नीची आणखी दोन मुले आहेत, साशा आणि ट्रिस्टन. हॅमस्वर्थने अॅव्हेंजर्स : एंडगेममध्ये थॉरची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'मॅन इन ब्लॅक : इंटरनॅशनल'मध्ये दिसणार आहे.

 • Australian actor Chris Hemsworth has named his daughter 'India Rose' as he like India
 • Australian actor Chris Hemsworth has named his daughter 'India Rose' as he like India

Trending