आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅस्ट्रेलियन फलंदाज स्मिथच्या डाेक्याला झाली गंभीर दुखापत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृत्तसंस्था | लंडन : अॅशेसमध्ये यजमान इंग्लंड संघाविरुद्ध दुसऱ्या कसाेटीच्या चाैथ्या दिवशी अाॅस्ट्रेलिया संघाने सर्वबाद २५० धावा काढल्या. संघाच्या विजयाची मदार असलेल्या स्मिथला मैदानावर खेळताना माेठी दुखापत झाली. त्याच्या डाेक्याला चेंडू लागला. त्यामुळे ताे ८० धावांवर रिटायर्ड हर्ट हाेऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने यादरम्यान अर्धशतकी खेळी करून संघाच्या धावसंख्येला गती दिली. त्याच्याकडून अाॅस्ट्रेलिया संघाला माेठ्या खेळीची अाशा हाेती. कारण, त्याची सलामीच्या कसाेटीत अाॅस्ट्रेलिया संघाच्या विजयात माेलाची भुमिका राहिली अाहे. त्याने या सलामीच्या कसाेटीत सलग दाेन्ही डावात शतक ठाेकले हाेते.    अार्चरचा चेंडू लागला : यजमान इंग्लंडच्या युवा गाेलंदाज जाेफ्रा अार्चरचा भरधाव चेंडू हा स्मिथच्या डाेक्यावर अादळला. यादरम्यान स्मिथ हा वैयक्तिक ८० धावांवर खेळत हाेता. शाॅर्ट पीचवरील चेंडूच्या लाईनवरून बाजुला हाेण्यास स्मिथला वेळ लागला अाणि चेंडू थेट त्याच्या हेल्मेटच्या खालच्या भागाला लागला. त्यामुळे त्याला दुखापत झाली.    इंग्लंडच्या ४ बाद ९६ धावा : इंग्लंड संघाने ३२.२ षटकांत ४ बाद ९६ धावा काढल्या. यासह इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात १०४ धावांची अाघाडी घेतली.  ऑस्ट्रेलियाच्या २५० धावा; इंग्लंड संघाची अाघाडी   

बातम्या आणखी आहेत...