आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी सर्व फॉरमॅटमध्ये सर्वात बेस्ट विकेटकीपर फलंदाज, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने केले माहीचे कौतुक 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पेन म्हणाला, धोनी सर्वात उत्कृष्ट फलंदाज आहे यात काहीही शंका नाही 
  • दबावातही शांत राहत धोनीने भारताला अनेक सामने जिंकून दिले - पॅट कमिन्स 

सिडनी - ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले आहे. तो म्हणाला धोनी पांढऱ्या चेंडूसह खेळणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. पेन म्हणाला, माझ्या मते धोनी क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये सर्वोत्कृष्ट विकेटकिपर फलंदाज आहे. धोनी यापूर्वीच्या दोन टी-20 सीरीजमध्ये टीम इंडियातून बाहेर होता. ऑस्ट्रेलिया विरोधातील वन डे सिरीजमध्ये तो खेळत आहे. 


कमिन्स म्हणाला-दबावातही तो शांत राहतो 
37 वर्षांच्या धोनीचे कौतुक करत पेन म्हणाला की, धोनी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे यात काहीही शंका नाही. हे अगदी खरे आहे. विशेषतः पांढऱ्या चेंडूसह खेळताना तो आपल्या सर्वांपेक्षा आघाडीवर राहिला आहे. 


ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनेही धोनीचे कौतुक करताना म्हटले की, अत्यंत कठीण परिस्थितीतही धोनीने त्याच्या शांत स्वभावामुळे भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. कर्णधार असताना स्वतःला शांत टेवून विरोधी संघाला पराभूत करण्याची त्याच्यात क्षमता होती. 


सराव सामन्यात फॅन्सना भेटला धोनी 
सिडनीमध्ये पहिल्या मॅचच्या पूर्वी प्रॅक्टीसदरम्यान एक फॅन धोनीपर्यंत पोहोचला होता. यावेळी धोनीने त्याला ऑटोग्राफ दिला आणि त्याच्याशी बोललादेखिल.  भारतीय संघ सध्या तीन वन डे सामन्यांची मालिका खेळत आहे. यातील पहिला सामना शनिवारी होत आहे. 


धोनीने ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिजच्या विरोधात सामना खेळला होता. आतापर्यंत त्याने 332 वनडे सामन्यांत 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2007 चा टी-20 वर्ल्डकप, 2011 वर्ल्डकप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. 

बातम्या आणखी आहेत...