Home | Sports | From The Field | australian cricketer decide retirement on cricket

ऑस्ट्रेलियाच्या स्टुअर्ट क्लार्कची क्रिकेटमधून निवृत्ती

Agency | Update - May 19, 2011, 05:06 PM IST

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टुअर्ट क्लार्क याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

  • australian cricketer decide retirement on cricket

    सिडनी - ऑस्ट्रेलियाचा मध्यमगती गोलंदाज स्टुअर्ट क्लार्क याने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

    सिडनीत सुरु होणाऱ्या टवेंटी-20 स्पर्धेत सिडनी सिक्सर्स या संघाच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी 35 वर्षीय क्लार्क स्वीकारणार आहे. ही स्पर्धा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. क्लार्कने आपण सिडनी विद्यापीठाकडून खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

    क्लार्क म्हणाला, ''मी क्लबकडून क्रिकेट खेळत राहणार असून, या दरम्यान नवीन खेळाडूंना प्रशिक्षणही देणार आहे. त्यामुळे मला आशा आहे की यातून ऑस्ट्रेलिया संघात खेळण्यासाठी खेळाडू तयार करायला माझी मदत होईल. सिडनी सिक्सर्स या संघावर माझे पूर्णपणे लक्ष केंद्रीत असणार आहे.''

    क्लार्कने आतापर्यंत खेळलेल्या 24 कसोटी सामन्यात 94 बळी आणि 39 एकदिवसीय सामन्यात 53 बळी घेतले आहेत. गेल्या मोसमात सायमन कॅटीचच्या गैरहजेरीत क्लार्कने न्यू साऊथ वेल्स संघाचे नेतृत्व केले होते.

Trending