आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलर्ट! ज्या Domino's पिझ्झाचा तुम्ही स्वाद घेतात, त्यांच्या किचनमध्ये सापडले सडलेले मांस, बुरशीवाले पनीर आणि खूप काही; डॉक्टरांनी दिला हा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - ऑस्ट्रेलियाच्या लिस्मोर शहरातील डॉमिनोज शॉप बंद करण्यात आले आहे. तेथे काम केलेल्या एका वर्करने शॉपच्या आतील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये शॉपच्या किचनमधील घाणीसोबतच सडलेले मांस, बुरशी असलेले पनीर, सडलेले सॉस, कंटेनरमध्ये किडे आणि घाण भांड्यांसोबतच इतर वस्तू दिसून येत आहेत.

डॉमिनोज अमेरिकन कंपनी आहे, जी पिझ्झासाठी फेमस आहे. भारतातील अनेक शहरांत त्यांची ब्रांच आहे. यामुळे येथील व्यक्तींनाही ही माहिती असली पाहिजे की, सडलेले अन्न खाल्ल्याने तुमच्या प्रकृतीवर काय परिणाम होऊ शकतात.

 

याबाबत आम्ही अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, विदिशाच्या सर्जरी विभागातील डॉक्टर नीरज जैन (MS जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, हे सडलेले अन्न खाल्ल्याने तुम्हाला कोणकोणते गंभीर आजार होऊ शकतात. दुसरीकडे, कोणत्या परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये अॅडमिटही व्हावे लागू शकते.

 

या आजारांचा धोका

> डॉ. नीरज यांच्या मते, उघडलेल्या फूडमध्ये पेनिसिलियम नावाची बुरशी लागू शकते. ज्यात किडे येतात.
> जर एखादा प्रोडक्ट लूज असेल वा खुला असेल, तर त्यात बुरशी लागण्याची किंवा किडे येण्याचे चान्सेस वाढतात.
> या प्रकारचे अन्न खाल्ल्याने अॅनिमिया, डायरिया, पोटदुखी, इन-डाइजेशन यासारखे आजार होऊ शकतात.
> आपले शरीर बॉडी अशा अन्नालाही डायजेस्ट करते, परंतु इन-डाइजेशनची समस्या झाली तर हॉस्पिटलाइजही व्हावे लागू शकते.

 

अशा अन्नामुळे पडाल आजारी
> जर सडलेले अथवा बुरशी लागलेले अन्न पोटात गेले तर ते पोटात गेल्यानंतर छोट्या आतड्यात थांबते.
> अशा वेळी त्यातील अंडे हे किड्यांचे रूप घेतात, आणि तेथे पसरू लागतात.
> हे किडे आतड्यांमध्ये घाण करतात, ज्यामुळे इन्फेक्शन होते आणि माणूस आजारी पडू लागतो.

 

या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष
> पोटदुखी अथवा डायरिया झाल्यावर जास्त पाणी प्या.
> जेवढे जास्त जमेल तेवढे ORS युक्त पाणी प्या.
> जर तब्येत बिघडतच चालली असेल तर डॉक्टरांना त्वरित कंसल्ट करा.

 

फास्ट फूड खाताना या गोष्टींकडे ठेवा लक्ष
> जर तुम्ही फास्ट फूड खात असाल, तर आधी ते पूर्णपणे तपासून घ्या.
> पिझ्झा, बर्गर, रोल अथवा इतर पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कंटेंटची तपासणी करा. शक्यतो त्यांची लेयर उघडून पाहून घ्या.
> जर एखादा पाकिटबंद पदार्थ तुम्हाला वाढला जात असेल तर त्याची एक्स्पायरी चेक करा. 

 

 

बातम्या आणखी आहेत...