Home | Sports | From The Field | australian leg spiner shane warne retired from all cricket

क्रिकेटमधील वॉर्नची मैफल संपली!

Agency | Update - May 22, 2011, 12:40 PM IST

'नाही' हा शब्द ज्याच्या शब्दकोशात नव्हता तो ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्नने शुक्रवारी मुंबईत अखेर स्पर्धात्मक क्रिकेटला 'नाही' म्हटले.

  • australian leg spiner shane warne retired from all cricket

    shane_256'नाही' हा शब्द ज्याच्या शब्दकोशात नव्हता तो ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्नने शुक्रवारी मुंबईत अखेर स्पर्धात्मक क्रिकेटला 'नाही' म्हटले.

    कारकीर्दीतील अखेरची स्पर्धात्मक लढत तो मुंबईत खेळला. राजस्थान रॉयल्सच्या वतीने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलच्या अखेरच्या साखळी लढतीत अखेरच्या षटकात बळी घेऊन वॉर्नने आपल्या स्पर्धात्मक क्रिकेटची सांगता केली. त्यासाठी त्याने मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराची, भारतीय क्रिकेटचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या मुंबईची निवड केली. वॉर्नच्या रंगतदार क्रिकेट कारकीर्दीची मैफल वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी विसर्जित झाली.
    राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणे हा बहुमान होता आणि एक वेगळाच अनुभव होता. त्या निमित्ताने मी भारतीय क्रिकेटला अप्रत्यक्ष मदत केली आहे, असे मला वाटते. चौहान, मनेरिया यांच्यासारख्या नवोदित खेळाडूंचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे वॉर्नने निवृत्तीच्या संध्येला सांगितले. राजस्थान रॉयल्सच्या सहकाऱ्यांनी आपल्या कर्णधाराला विजयी निरोप दिला. राजस्थान रॉयल्स संघ बाद फेरीत खेळण्यासाठी पात्र ठरू शकला नाही; परंतु वॉर्नने या संघाला सहाव्या स्थानापर्यंत नेण्यात मदत केली होती. विजयानंतर आपल्या अभिवादनाचा स्वीकार करून वॉर्न ड्रेसिंग रूममध्ये अंतर्धान पावला.

    स्पर्धात्मक क्रिकेटमधून जात असलो तरीही आपण वेगळ्या भूमिकेतून या खेळाशी जवळीक राखणार आहोत, असेही वॉर्नने सूचित केले. त्यामुळे आगामी आयपीएल स्पर्धांमध्ये शेन वॉर्न आपल्याला कदाचित वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळू शकेल.Trending