Home | International | Other Country | Australian Millionaire Is Hiring For The ‘Coolest Job In The World

The coolest job in the world: नेहमी या श्रीमंत व्यक्तीचा पर्सनल असिस्टंट म्हणून फिरावे लागेल, सॅलेरी मिळेल 25 लाख रूपये...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 05:52 PM IST

26 वर्षीय ऑस्ट्रेलिया अब्जाधीशाने सोशल मीडियावर एका जॉबची जाहिरात दिली आहे

 • Australian Millionaire Is Hiring For The ‘Coolest Job In The World

  इंटरनॅशनल डेस्क(सिडनी)- 26 वर्षांचे ऑस्ट्रेलियातले अब्जाधीशाने सोशल मीडियावर एका जॉबची जाहिरात दिली आहे. मॅथ्यू लेपर (Matthew Lepre) नावाच्या श्रीमंत व्यक्तीला असा पर्सनल असिस्टंट पाहिजे, जो नेहमी त्यांच्यासोबत राहू शकेल. यासाठी ते 52 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच 25 लाख रूपये सॅलेरी देण्यास तयार आहेत.

  - ई-कॉमर्स बिझनेसचे मालक मॅथ्यू लेपर यांच्या चार कंपन्या आहेत. त्यांची एका आठवड्यांची कमाई $85,764 म्हणजेच 59 लाख रूपये आहे. त्यांनी सोशल मीडियावर “The coolest job in the world” नावाच्या स्टाइलसोबत ही जाहिरात पोस्ट केली आहे.


  - लेपर आपल्या पर्सनल असिस्टंटला 25 लाख रूपयांसोबतच ट्रॅव्हलिंग, राहणे, खाणे-पीने आणि हेल्थ इन्श्योरंसचा खर्चदेखील देणार आहेत. ही सॅलेरी उमेदवाराच्या अनुभव आणि कॅपेबलिटीवर ठरवली जाईल. आतापर्यंत त्यांच्याकडे 40 हजार अर्ज आले आहेत. यात 75% महिला आहेत तसेच अनेकांनी तर त्यांना लग्नाचे प्रपोजलदेखील दिले आहे.

  - 26 वर्षीय लेपर यांनी सांगितले की, बहुतेक अॅप्लीकेशन हे ब्रिटन, इटली, दक्षिण अमेरिका आणि एशियन मुलींचे आहेत. त्यापैकी बहुतेक महिलांचे वय 23 ते 37 दरम्यान आहे.


  या नोकरीसाठी काय करावे लागेल?
  लेपर यांनी सांगितले की, उमेदवाराला कॉम्प्यूटरचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच तो सोशल मीडिया एक्सपर्ट असावा.

Trending