आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Australian Open : Novak Djokovic Won Australian Open

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्बियाच्या याेकाेविकची करिअरमध्ये १७ वी ग्रँडस्लॅम ट्राॅफी, डाेमिनिक थिएमचा केला पराभव; आज नंबर वनच्या सिंहासनावर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाचव्यांदा ५ सेटचा ग्रँडस्लॅम फायनल खेळला; चाैथ्यांदा मिळवला विजय
  • तीन वेगवेगळ्या दशकांत चॅम्पियन हाेणारा याेकाेविक दुसरा टेनिसपटू
  • तीन वेगवेगळ्या दशकात जिंकणारा ओपन एरातील पहिला टेनिसपटू ठरला

क्रिस्टोफर क्लेरी

मेलबर्न - सर्बियाचा टेनिसपटू नाेवाक याेकाेविकने सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. त्याने रविवारी आॅस्ट्रेलियन आेपन टेनिस स्पर्धेत पुुरुष एकेरीचा किताब पटकवला. यासह त्याच्या नावे आता आठव्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा विक्रम नाेंद झाला आहे. त्याने एकेरीच्या फायनलमध्ये डाेमिनिक थिएमचा पराभव केला. त्याने ६-४, ४-६, २-६, ६-३, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. या राेमहर्षक विजयासाठी त्याला तीन तास ५९ मिनिटे शर्थीची झंुज द्यावी लागली. मात्र, सरस खेळी करताना त्याने विजयश्री खेचून आणली. यामुळे याेकाेविकला या स्पर्धेत आठव्यांदा चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवता आला. यातून आता ताे या स्पर्धेत सर्वाधिक वेळ चॅम्पियन हाेणारा एकमेव टेनिसपटू ठरला.

पाचव्यांदा ५ सेटचा ग्रँडस्लॅम फायनल खेळला; चाैथ्यांदा मिळवला विजय 

याेकाेविकने करिअरमध्ये पाचव्यांदा पाच सेटपर्यंत ग्रँडस्लॅम फायनल खेळली आहे. यात त्याला चाैथ्यांदा विजयाची नाेंद करता आली. यापूर्वी त्याने गत वर्षी विम्बल्डनची फायनल आणि २०१४, २०१२ मधील ग्रँडस्लॅम फायनलमध्ये शानदार विजय मिळवण्याची कामगिरी केली आहे.

तीन वेगवेगळ्यात दशकांत चॅम्पियन हाेणारा याेकाेविक दुसरा टेनिसपटू  

याेकाेविक हा तीन वेगवेगळ्या दशकांत ग्रँडस्लॅम किताब जिंकणारा दुसरा टेनिसपटू ठरला. तसेच ओपन एरामध्ये (१९६८ नंतर) असे करणारा पहिला ठरला. त्याने २०००, २०१०, २०२० मध्ये किताब जिंकले. आॅस्ट्रेलियाच्या केन रोसवेलने १९५०,१९६०, १९७० मध्ये असा पराक्रम गाजवला हाेता.

राजीव राम-सेलिसबरी पुरुष दुहेरीत पहिल्यांदाच चॅम्पियन


अमेरिकेचा राजीव राम आणि इंग्लंडचा सेलिसबरी पुरुष दुहेरीमध्ये किताबाचे मानकरी ठरले. त्यांनी पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या जाेडीने ऑस्ट्रेलियाच्या ल्यूक सेविले आणि मॅक्स पर्सेलवर ६-४, ६-२ अशा फरकाने विजय मिळवला.