Home | International | Other Country | australian woman 70 reveals the secret of her youthful looks gets trolled

OMG: विश्वास बसणार नाही; 70 वर्षांची आहे ही महिला, रहस्य उलगडले तेव्हा झाली ट्रोल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 27, 2018, 11:34 AM IST

प्रत्यक्षात या महिलेचे वय 70 वर्षे आहे. तिने आपल्या सुंदर आणि चिरतरुण राहण्याचे रहस्य उलगडले आहे.

 • australian woman 70 reveals the secret of her youthful looks gets trolled

  पर्थ - ही आहे ऑस्डट्रेलियाच्या पर्थ शहरात राहणारी कॅरोलीन हर्ट्झ... तीन मुलांची आई असलेली ही महिला पहिल्या नजरेत 30-35 वर्षांची वाटते. परंतु, प्रत्यक्षात या महिलेचे वय 70 वर्षे आहे. तिने आपल्या सुंदर आणि चिरतरुण राहण्याचे रहस्य उलगडले आहे. तरीही अनेकांना तिचा दावा खोटा वाटतो. काही लोक तर तिच्या वयावरच विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. अनेकांनी तिला खोटार्डी म्हटले आहे.


  हे आहे तिचे रहस्य...
  कॅरोलीनच्या यंग लुकचे रहस्य म्हणजे ती साखर घेतच नाही. 41 वर्षांची असताना आपण प्रीडायबेटिक स्टेजला असल्याचे तिला कळाले होते. तेव्हापासून तिने साखर पूर्णपणे सोडली. गेल्या 28 वर्षांत तिने साखरेचा एक कण सुद्धा खाल्लेला नाही. साखरेच्या जागी ती जाइलिटॉलचा वापर करते. हा पदार्थ खाण्या-पिण्यात साखरेची कमतरता भरून काढतो. सोबतच ती रोज नियमित व्यायाम आणि बास्केटबॉल प्रॅक्टिस करते. निरोगी आणि चिरतरुण राहण्यासाठी पुरेसी झोप सुद्धा आवश्यक आहे असे ती सांगते.

  लोक म्हणाले खोटारडी...
  कॅरोलीन एक आंत्रप्रिन्योर सुद्धा आहे. ती स्वीटलाइफ नावाची कंपनी चालवते. ही कंपनी स्वीटनर बनवते. तिच्या कंपनीच्या गोड खाद्यपदार्थांमध्ये साखर ऐवजी जाइलिटॉलचा वापर करते. परंतु, लोकांनी तिच्या सोशल मीडिया पोस्टला खोटारडे ठरवले आहे. प्रत्यक्षात जाइलिटॉल आरोग्यासाठी साखरेपेक्षा घातक आहे असे लोकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर आरोग्याचे रहस्य सांगण्याच्या बहाण्याने ती आपल्याच कंपनीचा प्रचार करत आहे. खोट्या जाहिराती आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून ती लोकांची दिशाभूल करत आहे असेही लोक म्हणाले. तर काही लोकांच्या मते, आलीशान लाइफ असल्यास अशा महिलांना सजण्या-सवरण्या व्यतिरिक्त दुसरे काहीच काम नसते. महागडे मेक-अप आणि सर्जरी करून लोक असे लुक्स मिळवतात. मोजक्याच लोकांनी तिच्या टिप्सचे कौतुक केले आहे.

 • australian woman 70 reveals the secret of her youthful looks gets trolled
 • australian woman 70 reveals the secret of her youthful looks gets trolled

Trending