आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Author Chetan Bhagat Posts Images Of Ira Trivedi Emails After Allegation Of Harassment

#MeToo:लैंगिक शोषणाच्या आरोपात अडकलेल्या चेतन भगतने सादर केले पुरावे, महिला म्हणाली - आजच्या बोलीभाषेला माझा सिग्नल समजला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अडकलेला प्रसिद्ध लेखक चेतन भगत याने आता सोशल मीडियावर काही पुरावे सादर केले आहेत. ‘#MeToo मोहिमेचा मीच पीडित,’ म्हणत चेतनने इरा त्रिवेदीच्या मेलचे काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. इरानेच चेतन भगतवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. 


हे लिहिले ट्वीटमध्ये... 
2013 मध्ये इराने केलेल्या मेलचा स्क्रिनशॉट शेअर करत चेतनने प्रश्न विचारला की, ‘तुम्हीच सांगा आता कोणी कोणाला किस मागितलं? इराने मला पाठवलेल्या या मेलमधील शेवटची ओळ वाचा. ज्यामध्ये तिने kiss u miss u असं लिहिलं आहे. तिने माझ्यावर जे आरोप केले आहेत ते साफ चुकीचे आहेत. माझं आणि माझ्या कुटुंबियांचं मानसिक शोषण आता तरी थांबवा कारण या मोहिमेचा अनेकजण चुकीचा फायदा घेत आहेत.’

 

So who wanted to kiss whom? @iratrivedi’s self-explanatory email from 2013 to me, esp last line, easily shows her claims from 2010 are false, and she knows this too. This mental harassment of me and my family has to stop. Please don’t harm a movement with #fakecharges #harassed pic.twitter.com/SWeaSCfHLd

— Chetan Bhagat (@chetan_bhagat) October 15, 2018

 


इरा त्रिवेदीने दिले स्पष्टीकरण...
इरा त्रिवेदीने चेतन भगतच्या या ट्वीटवर उत्तर देताना लिहिले की, खोटे बोलायला भाग पाडणे किंवा धमकावण्याला ती घाबरणार नाहीये. इराने आणखी एका ट्वीटमध्ये लिहिले, संदर्भ नसताना एखादा जुना मेल दाखवणे आणि आजच्या बोलीभाषेत ज्या प्रकारे विश केले जाते, त्याला माझ्या बाजुने इंटेन्शन समजणे भरतची दयनीय स्थिती दाखवते.

 

 

The attempts at push-back, bullying and lying won't work. Undermining a “victims” credibility is such a pathetic and typical response.

I won’t be dragged into and drowned out by @chetan_bhagat attempts at making this an endless he said-she said. (1)

— Ira Trivedi (@iratrivedi) October 15, 2018

As much as I think Bhagat’s tactics don’t even deserve a response, I think it is only right to put the truth out there. That’s after all what got me here.

— Ira Trivedi (@iratrivedi) October 15, 2018


चेतन भगतने मागितली होती माफी...
एका महिलेने चेतन भगत यांच्यावर आपल्याला त्रास दिल्याचा आरोप करत दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्स अॅपवरील चॅटचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना चेतन भगत यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे संबंधीत महिलेची माफी मागितली होती. आपल्याला संबंधित महिला खूपच छान, चांगली आणि खूपच वेगळी वाटत होती. आपले लग्न झालेले असतानाही आपण अशा भावनांसह एखादे नातेसंबंध प्रस्थापित नाही करु शकत. मात्र, तरीही या महिलेशी माझ्या भावभावना जुळत असल्याचे मला वाटत होते. या महिलेशी आपण आगामी ‘वन इंडियन गर्ल’ या कादंबरीवरही चर्चा केल्याचा दावा भगत यांनी आपल्या पोस्टमध्ये केला होता. या प्रकरणावरुन चेतन भगत यांनी आपली पत्नी अनुषा हीची देखील माफी मागितली असून बऱ्याच वर्षांत संबंधीत महिलेशी आपला संपर्कही झालेला नाही, तिचा नंबरही आपण डिलीट केला होता, असेही त्यांनी आपला बचाव करताना म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...