आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- बजाज कंपनीची पल्सर ही मोटरसायकल भारतात चांगलीच लोकप्रिय आहे. आता याच लोकप्रियतेमूळे कंपनीने पल्सर 150 नियोनचे कलेक्शन सादर केले आहे. कंपनीने या नविन पल्सर 150 नियोनला एकदम नव्या अवतारात तिच्या स्पोर्टीलुकसह यंग आणि पेप्पी स्टाईलमध्ये सादर केले आहे. दिल्लीच्या एक्स शोरुमध्ये या बाईकची किंमत 65000 हजार आहे.
हे आहेत नविन बजाज पल्सर 150 नियोनचे फीचर्स
नविन बजाज पल्सर 150 नियोन बाईकला रेड, यलो आणि सिल्व्हर रंग अधिकच स्टाईलीश बनवतात. या बाईकमध्ये हेडलँप आयब्रो, पल्सरचा लोगो, साइड-पॅनल मॅश आणि अलॉय ग्रॅब रेल देण्यात आले आहे. बाईकच्या मागच्या भागात काउल आणि रंगीत अलॉय व्हील डीकलवर एक 3D हा लोगो बाईकला स्पोर्टीलुक प्रदान करतो.
या बाईकच्या लाँचच्या निमित्ताने बजाज ऑटोचे अध्यक्ष एरिक वास यांनी सांगितल्यानुसार, मागील 17 वर्षांपासून पल्सर बाईक भारतात क्रमांक एकवर आहे. पल्सर 150 नियोन एका नविन अवतारात सादर केली असून या बाईकमध्ये 4 स्ट्रोक, 2 व्हाल्व्ह, ड्युअल स्पार्क, एअरकुल्ड डीटीएस-आय इंजिन आहे. हे इंजिन 8000 आरपीएमवर 14,000 पावर आणि 6000 आरपीएमवर 13.4 एनएम टॉर्क निर्माण करते. या बाईकच्या व्हिलला 130 मिमी रिअर ड्रम ब्रेकसह 240 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.