आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील तरुणीला रिक्षाचालकाने बळजबरी दारू पाजली, मग निर्जनस्थळी नेऊन केला सामुहिक अत्याचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील एका तरुणीने दोन जणांच्या विरोधात सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ही तरुणी एका मुलाची आई असून गतवर्षीच तिच्या पतीचे निधन झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ती आपल्या माहेरी राहत होती. याच दरम्यान संपर्कात आलेल्या मुख्य आरोपीने आपल्या मित्रांसोबत मिळून तरुणीवर अत्याचार केला. पोलिसांनी या घटनेतील दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.


पीडित तरुणी फक्त 20 वर्षांची आहे. पतीच्या निधानानंतर माहेरी असताना तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत कृष्णा जाधव तिच्या संपर्कात आला. कृष्णा त्याच परिसरात ऑटो रिक्षा चालवतो. तिची मदत करण्याच्या बहाण्याने कृष्णाने तिची जवळिक साधण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान तिला शनिवारी अचानक आपल्या एका मित्राला (अक्षय चव्हाण) घेऊन तरुणीकडे गेला. यावेळी आपल्या एका मित्राची चिंताजनक असल्याचे सांगून तिला बाहेर नेले. कृष्णा नेहमीच मदत करताना अक्षयला सोबत ठेवायचा. त्यामुळे, तरुणी त्याला देखील ओळखत होती. या दरम्यान त्याने तरुणीला बळजबरी दारू पाजली. नशेत बेधुंद असताना तिला एका डोंगरावर नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. तरुणीने आपल्यावर शनिवारी घडलेल्या अत्याचाराची सोमवारी पोलिसांत तक्रार नोंदवली.