आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षीय तरुणीला पाहून ऑटो ड्रायव्हरने केले 'मास्टरबेशन', मुंबईतील हिरानंदानी परिसरात घडला लाजिरवाणा प्रकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एका ऑटो ड्रायव्हरचे लाजिरवाणे कृत्य मुंबईतील पॉश परिसरातून समोर आले आहे.  पवईच्या हीरानंदानी परिसरातील एका 19 वर्षीय तरुणीला पाहून ऑटो ड्रायव्हरने ''मास्टरबेशन'' केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तरुणी रात्री फिरण्यासाठी बाहेर आली होती, त्यावेळेस ही घटना घडली. नंतर तरुणीने ट्वीट करून मुंबई पोलिसांना घटनेची माहिती दिली.


तरुणीने सांगितले की, 'अंदाजे रात्री 12 वाजता मी हीरानंदानीमध्ये तलावाजवळ जॉगिंग करत होते. हायवेपर्यंत गेल्यानंतर मी परत फिरले. त्यावेळी मला रस्त्यावर काही लोक दिसले. त्यांना पाहून मी थोडी घाबरले. त्यामुळे मी तेथील एका बँकेच्या एटीएमजवळ बसले. त्यावेळी मला दिसले की, समोर असलेल्या ऑटोमधील व्यक्ती मला पाहून "मास्टरबेशन" करत आहे.' 


तरुणीने पोलिसांना सांगितले की, त्या व्यक्तीची दाढी वाढलेली होती आणि त्याने ऑटो ड्रायव्हरचा युनिफॉर्म घातलेला होता. तिने सांगितले की, तो सगळा प्रकार पाहून ती खूप घाबरली, त्यामुळे ऑटोचा नंबर लिहायचा तिच्या लक्षात आले नाही. पुढे ती म्हणाली की, 2015 पासून मुंबईत राहते, पण पहिल्यांदाच अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे.

 

त्या परिसरातील अनेक ऑफीस आणि कॉम्प्लेक्स आहे, त्यामुळे सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाली असावी.  पोलिस म्हणाले की, हे एक गंभीर प्रकरण आहे आणि याचा कसुन तपास केला जाईल. त्या परिसरात जे कोणी ऑटो ड्रायव्हर असतील, त्यांची आम्ही चौकशी करू.