आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपडे चेंज करताना रडू लागली चिमुरडी, आईने कारण विचारले तर सांगितले ऑटो वाल्या अंकलचे कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - प्रतापनगरमध्ये एका केजीच्या मुलीची शाळेमध्ये घेऊन जाणाऱ्या आणि आणणाऱ्या अॅटो चालकाने छेड काढल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी भागचंद धोबीवर पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पण तो सध्या फरार आहे. 


पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये हे समोर आले आहे की, हा रिक्षा ड्रायव्हर मुलीला शाळेत सोडण्यासाठी सर्वात आधी घरातून घ्यायचा. तर शाळा सुटल्यावर सर्वात शेवटी या मुलीला सोडायचा. या दरम्यान ही चिमुरडी त्याच्याबरोबर एकटी असायची. हीच संधी साधून हा रिक्षा ड्रायव्हर तिची छेड काढत होता. शनिवारी शाळेतून आल्यानंतर सेक्टर 8 मध्ये राहणारी ही मुलगी रडायला लागली होती. आईने तिचे रडण्याचे कारण विचारले त्यानंतर तिले अॅटोवाले अंकल तिच्याबरोबर कसे कृत्य करतात ते सांगितले. ते ऐकूण आईने लगेचच मुलीच्या वडिलांना याबाबत सांगितले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 

बातम्या आणखी आहेत...