आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रशस्त आकर्षक वाहनांनी वेधले माेटारप्रेमींचे लक्ष; चीनच्या ग्रेट वॉल मोटार्सचा भारतात प्रवेश, ७ हजार काेेटींच्या गुंतवणुकीची घाेषणा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एमजी मोटार्सने इलेक्ट्रिक कार मॉरव्हेल एक्स सादर केली
  • टाटा, किआ आणि ह्युंदाई एसयूव्ही - प्रीमियम गाड्या लाँच

ऑटो एक्सपो - दिल्लीमध्ये  बुधवारपासून बहुप्रतिक्षित अशा आॅटाे एक्स्पाेला सुरुवात झाली. या वर्षी  ‘एक्स्प्लाेअर द वर्ल्ड ऑफ मोबिलिटी’ ही प्रदर्शनाची संकल्पना आहे. या प्रदर्शनात ९० वाहन कंपन्या सहभागी झालेल्या असून अनेक कंपन्यां नवीन वाहने या निमित्ताने बाजारात दाखल केली. या प्रदर्शनात नवीन वाहनांबराेबरच अपडेट व्हर्जन, कन्सेप्ट कार सादर झाल्या. विशेष म्हणजे बहुतांश गाड्या या माेठ्या आकाराच्या सादर झाल्या आहेत. यंदाच्या वर्षी इलेक्ट्रिक कार हे माेटार प्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू असतील. अनेक सेलिब्रेटीही भेट देत आहेत.

एमजी मोटार्सने इलेक्ट्रिक कार मॉरव्हेल एक्स सादर केली
एमजी मोटार्सने माॅरव्हेल एक्स इलेक्ट्रिक एसयुव्ही सादर केली आहे. त्यात ५२.५ किलाेवॅट क्षमतेची बॅटरी लावण्यात आली आहे. यात ११४ बीएचपी आणि दुसरी ७० बीएचपी अशा दाेन बॅटरी बसवण्यात आल्या आहेत. या एसयुव्हीचा चार्जर ८.५ तासात चार्ज केला जाऊ शकताे. जलद चार्जिंगसाठी ४० मिनिटे लागतात. याची रेंज ४०० कि.मी. आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने पंच तारांकित मानांकन या एसयुव्हीला मिळालेले आहे.

मोस्ट अवेटेड 

टाटा : हॅरियर २०२० लाँच, सोबत १४ व्यावसायिक, १२ प्रवासी वाहने


टाटा मोटार्सने १४ व्यावसायिक व १२ प्रवासी वाहने बाजारात आणली. यात बहुप्रतिक्षित हॅरियर २०२० चाही समावेश आहे.  मॅन्युअल व्हर्जनची किंमत १३.६९  लाख असेल. टॉप व्हेरिएंटची किंमत २०.२५ लाख असेल. हे २.० लीटर डिझेल इंजिन आहे. पॉवर १७० पीएस / ३५०  एनएम आहे. स्वयंचलित व्हर्जन १६.२५ लाखांचे असेल. टाटा ग्रॅव्हीटासही दाखल झाली आहे. ही यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत लाँच होऊ शकते.किआ मोटर्स : कॉर्निव्हल एमपीव्ही लाँच, सोनेट वर्षअखेरीस येणार 


प्रीमियम गाडी कॉर्निव्हल एमपीव्ही दाखल झाली आहे.  सेल्टोसनंतरची ही भारतातील दुसरी कार आहे. ही प्रीमियम, प्रेस्टिज, लिमोझिन या तीन व्हर्जनमध्ये लाँच केली आहे. २४.९६ ते ३३.९५ लाख किंमत आहे.मारुती: पेट्रोल व्हर्जनमध्ये ब्रेझा,१८.७६ कि.मी/लिटर मायलेजचा दावा

मारुती सुझुकीने ब्रेझाला नवा लूक दिला आहे. ब्रेझाचा हा नवा अवतार म्हणजे नवीन फ्रंट ग्रील आहे. कारच्या हंॅडलॅम्पसचे डिझाईनही बदलण्यात आले आहे. यामध्ये शक्तिशली १.५ लिटर बीएस - ६ पेट्राेल इंजिन असेल जे १०३ हाॅर्सपाॅवरची ताकद आणि १३८ एनएम टाॅर्क निर्माण करताे. याशिवाय ब्रेझामध्ये आता मारुतीचा नवा स्मार्ट प्ले स्टुडिआे देखील मिळेल.ऑटोमॅटिक मोड वर प्रति लिटर १८.७६ कि.मी.चे मायलेज मिळेल लवकरच बाजारात दाखल हाेईल.

अपडेट्स1. मारुती : इलेक्ट्रिक कार फ्युचरो-ई चे कन्सेप्ट माॅडेल सादर


मारुती सुझुकीने इलेक्ट्रिक कन्सेप्ट कार फ्युचरो ई कॉन्सेप्ट सादर केले. याद्वारे भविष्यात इलेक्ट्रिक सेग्मेंटमध्ये आणेल. ब्रेझा, इग्निस, एस-क्रॉसचे अपग्रेडेड व्हर्जन लांॅच हाेईल.

 

2. स्कोडाची ऑक्टोव्हिया रेनॉची ट्रिबर नव्या रूपात
 
कंपनीने ऑक्टोव्हिया आरएस २४५ लांॅच केले आहे. तिची किंमत ३६ लाख आहे. शिवाय रेनाॅ कंपनीने बहुप्रतीक्षित वाहन ट्रिबरचे नवीन व्हर्जन एमटी सादर केले. या सात आसनी नव्या ट्रिबरमध्ये आॅटाेमॅटिक ट्रान्समिशन गियर बाॅक्स आहे.

3. ग्रेट वॉल मोटार्सचे चार एसयूव्ही माॅडेल सादर 


चीनच्या एसयूव्ही उत्पादन करणाऱ्या ग्रेट वाॅल माेटार्सनेही भारतात प्रवेश केला. कंपनी देशात संशाेधन व विकासावर ७ हजार काेटी रुपये खर्च करेल. कंपनीने हेव्हेल एच ९, एफ ७ , एफ ५ व एफ ७ एक्स चार माॅडेल दाखवले.